शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व घटकांशी संवाद साधूनच विकास शक्य

By admin | Updated: November 30, 2014 23:02 IST

गोंडवाना विद्यापीठ गतीमान होण्यासाठी व सर्वांचा विश्वास संपादन करण्यासाठी विद्यापीठातील सर्व घटकांशी संवाद साधून, सर्वांच्या समस्या व त्यावरील उपाय विचारात घेऊनच विद्यापीठाचा विकास

ब्रह्मपुरी : गोंडवाना विद्यापीठ गतीमान होण्यासाठी व सर्वांचा विश्वास संपादन करण्यासाठी विद्यापीठातील सर्व घटकांशी संवाद साधून, सर्वांच्या समस्या व त्यावरील उपाय विचारात घेऊनच विद्यापीठाचा विकास व भावी वाटचाल करणे शक्य आहे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी केले. नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयच्या वतीने महाविद्यालयात आयोजित चर्चासत्रात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत संलग्नित असलेल्या विविध महाविद्यालयीन संचालक मंडळींशी, प्राचार्य प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी व्यासपीठावर ने.हि. शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी भैय्या, सहसचिव अ‍ॅड. भास्करराव उराडे, डॉ.पी.एम. डोळस, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार-समन्वयक नागपूर विभागाचे प्रभारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस. कोकोडे, उपप्राचार्य डॉ.डी.ए. पारधी, विज्ञानशाखेचे अधिष्ठाता डॉ. अमीर धम्मानी प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील विविध संस्थांचे सन्माननिय पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापकवृंद, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होता. चर्चासत्राची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी मदनगोपालजी भैय्या यांना मालार्पण करून तसेच विद्यापीठ गीताने झाली. याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांचा ने.हि. महाविद्यालयाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू म्हणाले, विद्यापीठाचे वय अवघे तीन वर्षाचे आहे. विद्यापीठासमोर अनेक समस्या असून प्राधिकरण नसल्याने निर्णय प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो म्हणूनच या समस्येवर मात करून सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांशी संवाद साधून व अनावश्यक नियम व अडथळे दूर करून विद्यापीठाचा विकास व भावी वाटचाल करणे शक्य आहे. विद्यापीठाचे वय अवघे तीन वर्षांचे आहे. विद्यापीठासमोर अनेक समस्या असून प्राधिकरण नसल्याने निर्णय प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो, असेही दीक्षित यांनी यावेळी स्पष्ट केले.याप्रसंगी कुलगुरुंनी उपस्थित विविध महाविद्यालयीन संस्थाचालक मंडळींशी, प्राचार्यांशी, प्राध्यापकांशी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संवाद साधला. (तालुका प्रतिनिधी)