शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

नि:शब्द वातावरणात झाला डाॅ. शीतलच्या शर्वीलचा वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:29 IST

फोटो-०४सीपीपीएच१६ - शर्वीलचे आपल्या आई-वडिलासोबतचे संग्रही छायाचित्र. वरोरा(चंद्रपूर) : डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूला आज पाच दिवस झाले. आज ...

फोटो-०४सीपीपीएच१६ - शर्वीलचे आपल्या आई-वडिलासोबतचे संग्रही छायाचित्र.

वरोरा(चंद्रपूर) : डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूला आज पाच दिवस झाले. आज डाॅ. शीतलचा सहा वर्षीय मुलगा शर्वीलचा वाढदिवसही होता. दरवर्षी आई डाॅ. शीतल वृक्ष लागवड करून आपल्या शर्वीलचा वाढदिवस साजरा करायची. आज शर्वीलने आईच्या आठवणीत वृक्ष लावून आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी आनंदवनातील वातावरण भावूक आणि नि:शब्द होते.

वृक्ष लागवड केल्यानंतर शर्वील आपल्या आईच्या समाधीजवळ गेला. त्यावेळी त्याच्या डोळ्यात आसवे तरंगत होती. हातात जास्वंदाचे फुल घेऊन बोबळ्या शब्दात मम्मा म्हणत त्याने आपल्या आईला ते अर्पण केले. या भावूक क्षणाचे साक्षीदार त्याचे वडिल गौतम करजगी, आजोबा डाॅ. विकास आमटे, आजी भारती आमटे, सुहासिनी करजगी व शिरिष करजगी यांच्यासह आनंदवनातील परिवार होता. शर्वील आईविना पोरका झालेला आहे. तो सतत आईची आठवण करीत असल्याचे समजते. त्याचे मन कुठल्याही गोष्टीत रमत नसल्याने त्याचे वडिल गौतम करजगी, आजी सुहासिनी करजगी व शिरिष करजगी यांनी त्याला या आठवणीतून काही काहीकाळासाठी का होईना बाहेर काढण्यासाठी नागपूरला घेऊन गेले असल्याची माहिती मिळाली.

आनंदवन पुर्वपदावर येत असला तरी कोणच्याही चेहऱ्यावर आनंद दिसला नाही. सारेकाही संपल्यागत आनंदवनातील मंडळी आपापली कामे करताना दिसून आली. आनंदवनात नीरव शांतता बघायला मिळाली.