बल्लारपूर: मे महिन्याला सुरुवात झाली आहे. याच महिन्यात लग्नाचे मुहूर्त अधिक आहे. उन्हाचा पारा आताच ४५ हून अधिक गेला असून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रसंगी दुपारच्या लग्न कार्यात मुलाबाळांसह लग्नाला हजेरी कशी लावायची, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.शहरातील जवळच्या लग्नाचे एकदाचे ठीक आहे. पण, बाहेरगावी या उन्हात जाणे कठीण झाले आहे. बसमध्ये गर्दी, धामाधूम होऊन, उड्या टाकीत जागा बळकाविण्याकरिता धक्के-बुक्के देत बसमध्ये प्रवेश करावा लागतो. काही जण बसच्या सीटवर बाहेरुन आधीच रुमाल टाकून ठेवतो. अनेकवेळा जागेसाठी वाद होतात. या सर्वांवर मात करीत प्रवाश करावा लागतो. कसा बसा प्रवास झाला की, लग्न मंडपी वरातीला येण्याला उशीर, सभागृहात पंखे, पाण्याची व्यवस्था असेल तर ठीक, अन्यथा, परत गरमीचा त्रास होतो. लग्नाला उशीर म्हणजे जेवणाला उशीर होतो. जेवण घेण्याकरिता तुंबड गर्दी, या गर्दीत जे मिळाले न मिळाले ते घ्या आणि कसे बसे जेवण आटपा असा सर्व आटापिटा करावा लागतो.सारे थकलेले चेहरे- सायंकाळ झाली तरी, उकाळा कायम असतो. नकोत अशी लग्न असा हुंकार सध्या महिलांमध्ये निघत आहे. आपण नाही गेलो तर आपल्या घरी लग्न कार्यात कोण येणार, या भीतीपोटी लग्न कुठेही असो, प्रवास कठीणचा आहे हे माहीत असतांनाही मुलाबाळांसह जावेच लागते. या महिन्यात १२ तारखेला लग्नाचा मोठा ठोक आहे. गावोगावी, बसस्थानक आणि रस्त्यांवर लग्न मंडपी जाणार्यांची घाईदिसणार आहे. हा पूर्ण महिनाच लग्नाचा आहे आणि कडक उन्हाचाही!(तालुका प्रतिनिधी)
उन्हामुळे लग्नकार्याला हजेरी लावणे कठीण
By admin | Updated: May 8, 2014 01:47 IST