शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थीदशेतही ‘तो’ ठरतोेयं युवकांसाठी प्रेरणादायी

By admin | Updated: January 11, 2015 22:48 IST

आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकालाच विविध समस्यांना तोंड देत ध्येय गाठावे लागते. यात काही माणसं अशी असतात ते अग्निपरिक्षेतून विश्व निर्माण करतात आणि अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतात.

रत्नाकर चटप - नांदाफाटाआयुष्याच्या प्रवासात प्रत्येकालाच विविध समस्यांना तोंड देत ध्येय गाठावे लागते. यात काही माणसं अशी असतात ते अग्निपरिक्षेतून विश्व निर्माण करतात आणि अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतात. अशीच प्रेरणा बिबी येथील अविनाश पोईनकर (२२) यांच्या कार्यातून अनेक विद्यार्थ्यांना आज मिळत आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला आणि लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेला अविनाश डीएडची पदवी घेऊन सध्या चंद्रपूर येथे बी.ए. अंतीम वर्षाचे शिक्षण घेत आहे. वस्तीगृहात राहून आणि खाजगी कार्यालयात काम करुन तो शिक्षण घेत आपल्या कुटुंबाची धुरा सांभाळत आहे. लहानपणापासून कविता लिहण्याचा छंद असलेल्या अविनाशने या क्षेत्रात आज मजल मारली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, अस्मितादर्श साहित्य संमेलन, राष्ट्रसंत विचारकृती साहित्य संमेलन आदी साहित्य संमेलनातून त्याने साहित्यक्षेत्रात आज मोठी उंची गाठली आहे. त्याचबरोबर जिल्हा व राज्यस्तरावरील विविध कविसंमेलनातून त्याने आपल्या साहित्याची छाप सोडली आहे. याचबरोबर सामाजिक दायित्व म्हणून बीबी गावात सेवार्थ ग्रुप ही सामाजिक संघटना बांधली. या माध्यमातून ग्रामस्वच्छता राबविणे, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाज सेवकांना पुरस्कार देणे, वृक्षारोपण, व्यक्तीमत्व विकास कार्यक्रम, युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी उपक्रम राबविले जात आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून अनेक संस्थांनी पुरस्कारही दिले आहे. यामध्ये सिंबायसेस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ पुणेचा ‘महाराष्ट्राचा मराठी वाचक’ पुरस्कार २०१२, तुकोबाराम काव्य पुरस्कार, राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, नवांकुर साहित्य पुरस्कार, विदर्भस्तरीय वक्तृत्व पुरस्कार, वर्धा येथील आदर्श विद्यार्थी पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. साहित्याच्या सोबत अविनाशने वक्तृत्व, वादविवाद, संचालन आदी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विविध बक्षिसे प्राप्त केली आहे. गेल्या सात ते आठ वर्षापासून अनेक वृत्तपत्र, नियतकालिके, दिवाळी अंकातून त्याच्या कविता आणि साहित्य प्रकाशित झाले असून आजही हे कार्य सुरुच आहे. गावरानातील कविता, काव्यपुष्प, अक्षरवैदर्भी, सत्याग्रही विचारधारा, अंकुर, अक्षरवेल आदी काव्यसंग्रह व मासिकातून कवितेचे प्रकाशन झाले आहे. त्यामुळे आज कोरपना तालुक्यातील अनेक युवकांना प्रेरणा देऊन वाचन व लिखाण संस्कृतीला समृद्ध करण्याचे धडे देण्याचे कार्य अविनाश करीत आहे.