शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व धान खरेदीची रक्कम अदा करण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST

चंद्रपूर : धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व धान खरेदीची रक्कम अदा करण्याच्या दृष्टीने २१ डिसेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये ...

चंद्रपूर : धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व धान खरेदीची रक्कम अदा करण्याच्या दृष्टीने २१ डिसेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२०-२१ मधील खरेदी केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये प्रोत्साहनपर राशी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. या प्रोत्साहनपर राशीची रक्कम अदा करण्यासाठी शेतकरी व अभिकर्ता संस्थांकडे वर्ग करण्यात आली असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे, अशी माहिती माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

खरीप व रबी हंगामातील धान खरेदीची संपूर्ण रक्कम अभिकर्ता संस्थांकडे वर्ग करण्यात आली आहे. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार मुनगंटीवार यांना पत्र पाठवून ही माहिती कळवली आहे.

खरीप व रबी हंगाम २०२०-२१ मधील धानानुसार धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रदान करावयाच्या प्रोत्साहनपर राशी तसेच खरेदीची रक्कम थकीत होती. यासाठी सुमारे ८०० कोटी रुपये रक्कम थकीत असताना केवळ ३०० कोटी रुपये रक्कम मंजूर केली. राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाच्या बोनसची रक्कम पूर्णपणे प्रदान न केल्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. शेतीकामासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असताना त्यांच्या हक्काची रक्कम थकीत असल्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असताना पुन्हा मुसळधार पावसाने शेतीला बसलेला फटका लक्षात घेता धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घातली गेली. या संदर्भात मुख्यमंत्री, अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार केला होता. तसेच प्रत्यक्ष भेटून विनंती केली होती, अशी माहितीही आमदार मुनगंटीवार यांनी दिली.

090921\img-20210909-wa0000.jpg

ना. छगन भुजबळ यांना पत्र देताना आमदार सुधीर मुनगंटीवार.