शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त भागात प्रथमच आयएसओ मानांकन

By admin | Updated: January 28, 2017 00:58 IST

गुणवत्ता आणि दर्जा राखण्यासाठी आएसओ हे मानांकन नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या दुर्गम भागातील गडचांदूर

गडचांदूर एसडीपीओ कार्यालय : प्रजासत्ताकदिनी प्रमाणपत्र प्रदानचंद्रपूर : गुणवत्ता आणि दर्जा राखण्यासाठी आएसओ हे मानांकन नक्षलग्रस्त समजल्या जाणाऱ्या दुर्गम भागातील गडचांदूर येथील पोलीस उपविभागीय कार्यालयाला प्राप्त झाले आहे. नलक्षग्रस्त भागातील शासकीय कार्यालयाला प्रथमच आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. जिल्ह्यातील जिवती तालुका नक्षलग्रस्त भागाच्या यादीत आहे. . गडचांदूर या पहाडावरील दुर्गम भागातील उपविभागीय अधिकारी कार्यालयालयाने नागरिकांना तत्पर सेवा देतानाच त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. कार्यालय परिसरात स्वच्छता राखणे, कार्यालयातील अभिलेख नियमावलीनुसार अद्यवत ठेवणे आदी कामांवर लक्ष केंद्रीत करून उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी कामाला सुरुवात केली. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान आणि अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. आयएसओ मानांकन देणाऱ्या आंतराष्ट्रीय प्रमाणके संघटनेनेच्या पथकाने या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची पाहणी केली. गडचांदूर पोलीस उपविभागीय कार्यालयाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक दिवान, अपर पोलीस अधीक्षक राजपूत आणि एसडीपीओ खिरडकर यांनी आयएसओ प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी आ. नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदरसिंह, डीवायएसपी जयचंद काठे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रतिकूल परिस्थितीत राखला दर्जागडचांदूर पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात जिवती, गडचांदूर, पाटण, कोरपना, टेकमांडवा, भारी, पिट्टीगुडा आदी पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. हे सर्व पोलीस स्टेशन दुर्गम आणि पहाडी क्षेत्रामध्ये आहेत. दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थिती असताना कामात सातत्य राखण्यात यश आले. गडचांंदूर एसडीपीओच्या कार्यक्षेत्राला लगत परराज्याची सीमा आहे. आठ कार्यालयांना आयएसओ प्रमाणपत्रयापूर्वी सर्वात प्रथम चंद्रपूर पोलीस उपविभागीय कार्यालयाने हा मान पटकाविला. याशिवाय चंद्रपूर एसडीपीओअंतर्गत कार्यरत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन, रामनगर, दुर्गापूर, घुग्घुस, बल्लारशाह या पोलीस ठाण्यांना आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. तसेच चंद्रपूर वाहतूक शाखेला व राजुरा पोलीस ठाण्यालाही हे प्रमाणपत्र मिळाले आहे.