शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाचा उडाला बोजवारा !

By admin | Updated: July 9, 2015 00:59 IST

गेल्या काही वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना बंधारे मोठा आधार देत असतात.

निधी धूळ खात : आठ महिन्यात कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना पाच वर्षातही अपूर्णचंद्रपूर : गेल्या काही वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना बंधारे मोठा आधार देत असतात. सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने दरवर्षी विविध योजनातून सिंचनाची कामेही मंजूर केली जात आहेत. मात्र, वेगवेगळी कारणे समोर करुन कंत्राटदार, ग्रामपंचायतींची सिंचनाच्या कामातही चालढकल सुरू आहे. त्यांच्या कामाचे करार आता रद्द करण्यात आले. आता तर कामे न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. असे असले तरी सिंचनाचा मात्र बोजवारा उडाला आहे.जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागामार्फत सिंचनाची कामे केली जातात. जिल्ह्यात १ हजार ६७८ मामा तलाव, ६३९ कोल्हापुरी बंधारे, ८५ लघु पाटबंधारे तलाव आणि १ हजार १० सिमेंट प्लग बंधारे आहेत.इंग्रज काळातील माजी मालगुजारी तलावांची संख्याही मोठी आहे. मामा तलावासह कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग बंधाऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे दरवर्षी डागडुजीची मोहीम सिंचाई विभागाला राबवावी लागत आहे.विदर्भ संगम सिंचन योजना, जिल्हा निधी, शेषफंडातून अन्य योजनातून दुरुस्तीची कामे केली जातात. २००९ ते २०१० या दरम्यान सिंचाई विभागाने मामा तलाव दुरुस्ती, सिमेंट प्लग बंधारे, कॅनल दुरुस्ती, माजी मालगुजारी तलावाच्या दुरुस्तीच्या निविदा काढल्या. या दोन्ही वर्षात ४६ कामांच्या निविदा निघाल्या. जवळपास कोट्यवधींची ही कामे होती. ही कामे प्रामुख्याने ग्रामपंचायती, सुशिक्षित बेरोजगार आणि कंत्राटदारांनी घेतली. या कामाचा कालावधी सहा महिने, आठ महिने असा होता. मात्र, पाच वर्षांचा काळ लोटत आला, तरी अजूनही कामे सुरूच झाली नाहीत. वेगवेगळी कारणे पुढे करून ग्रामपंचायती, कंत्राटदारांनी सिंचनाची कामे थांबविली आहेत. कामे सुरू करण्याबाबत वारंवार स्मरणपत्र देण्यात आले. मात्र, स्मरणपत्रांनाही कंत्राटदारासोबत ग्रामपंचायतींनी केराची टोपली दाखविली. यामुळे कोट्यवधींची सिंचनाची कामे रद्द करण्यात आली. कामे न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची शिफारसही विभागाने केल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)बंधाऱ्यात पैसा जिरला, मात्र पाणी अडले नाहीराजुरा : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. यात सिंचनाच्या नवीन कामासोबतच जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसह गाळ उपसा व खोलीकरणाचे कामे करण्यात येत आहे. या माध्यमातून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. या अभियानामुळे शेतकऱ्यांनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न रंगविले, पण अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे मागील वर्षीचे अनेक बंधारे बुजगावणे ठरत असल्याचे पहायला मिळत आहे. चार्ली गावालगतच्या नाल्यावर लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. यापूर्वी हजारो रुपये खर्च करून दुरुस्तीसह खोलीकरण करण्यात आले. परंतु अधिकाऱ्यांच्या ठोस नियोजनाअभावी व तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष केल्याने या बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही साचला नसल्याने लाखोंचा निधी वाया गेला, पैसा जिरला, मग पाणी कुठे पळाले? असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत. नदीपट्टा परिसरातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चार्ली गावाजवळील नाल्यावर बंधाऱ्याची श्रृंखला तयार करण्यात आली आहे. एका बंधाऱ्यात साचलेल्या पाण्याचे टोक पुढल्या बंधाऱ्यापर्यंत राहील व प्रत्येक बंधारे पाण्याने तुडुंब भरलेले असतील व यातून सिंचनाची व्यवस्था व पाण्याच्या पातळीत वाढ होईल या कल्पनेतून बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या साखळीतील शेवटच्या बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही साचला नसल्याचे वास्तव आहे. मागील आठवड्यातील संततधार पावसाने या बंधाऱ्याच्या बांधकामातील ढिसाळपणा उजागर झाला आहे. बांधकामाच्या तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष केल्याने बंधाऱ्याचा पायाच कमकुवत असल्याचे स्पष्ट होत आहे आणि याच पाईपमधून सारे पाणी पळाल्याने बंधारा केवळ बुजगावणे ठरला. निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा हा परिणाम असून अधिकाऱ्यांनी केवळ कागदावरच नियोजन केल्याचे स्पष्ट होत आहे. मागील वर्षी या बांधकामासाठी लाखोचा खर्च करण्यात आला असून यावर्षी गाळ उपस्यासह खोलीकरणात हजारो रुपयांचा चुराडा झाला.