शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वीज केंद्रातून तीन ट्रकमधून लोखंड चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:09 IST

वीज केंद्रातील वेस्टेज फलॉयअ‍ॅश वाहतुक करणाऱ्या तीन वाहनातून लोखंड चोरून नेताना केंद्राच्या सुरक्षा विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी दुपारी ३.३० वाजता पडोली येथील एका भंगार दुकानात करण्यात आली.

ठळक मुद्देट्रक चालकांसह सहा जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वीज केंद्रातील वेस्टेज फलॉयअ‍ॅश वाहतुक करणाऱ्या तीन वाहनातून लोखंड चोरून नेताना केंद्राच्या सुरक्षा विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी दुपारी ३.३० वाजता पडोली येथील एका भंगार दुकानात करण्यात आली.चंद्रपूर वीज केंद्रातून फ्लॉय अ‍ॅशमध्ये वेस्टेज राख टाकण्याचे कंत्राट विजय गिते यांच्या विजय इंटरप्रायसेस कंपनीला देण्यात आले. शनिवारी दुपारी एमएच ३४ एम ९४९२, एमएच ०४ एजी २०२० आणि एमएच १९ झेड २८७९ क्रमांकाच्या तीन वाहनातून वीज केंद्रातील राख भरून रिजेक्ट गेटमधून बाहेर निघाले. सदर गेटवर सीआयएसएफचे सुरक्षा कर्मचारी तैनात राहतात. मात्र त्यांची नजर चुकवून ही वाहने अ‍ॅश बॅन्ड परिसरात पोहोचली. त्या ठिकाणी फ्लॉय अ‍ॅश रिकामे केल्यानंतर वीज केंद्रातील लोखंड वाहनामध्ये लपवून ठेवले होते. लोखंड विकण्याकरिता पडोलीतील एका भंगार दुकानात पोहोचले. ही माहिती वीज केंद्रातील सुरक्षा कर्मचाºयाला मिळाली. दरम्यान, भंगार दुकानात लोखंड विकत असताना चालकासह सहाही आरोपींना रंगेहात पकडले. वीज केंद्राने दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या लोखंडाची किंमत ३१ हजार रूपये आहे. पोलिसांनी तिनही वाहनाचे चालक व वाहक अशा सहा जणांना अटक केली. या घटनेचा अधिक तपास केल्यास संबंधित कंत्राटदार अडचणीत येण्याची शक्यता आहे.विजय इंटरप्रायजेस कंपनीच्या ट्रकमधील राखेमध्ये भंगार लपवून ठेवले होते. सुरक्षा कर्मचाºयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली आहे. ३१ हजार ६७५ रूपये या भंगाराची किंमत आहे. चौकशीत आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.- दीपक खोब्रागडे,पोलीस निरीक्षक, दुर्गापूर.

टॅग्स :Thiefचोर