शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
5
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
6
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
7
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
8
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
9
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
10
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
11
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
12
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
13
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
14
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
15
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
16
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
17
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
18
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
19
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
20
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती

इरई नदीचे जलस्त्रोत प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:53 IST

चंद्रपूर शहराला १९६४ पासून दररोज १० दशलक्षमीटर पाणीपुरवठा करणाºया दाताळा मार्गावरील इरई नदीचा जलस्त्रोत प्रदूषित झाल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे

ठळक मुद्देमहानगर पालिकेचे दुर्लक्ष : शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराला १९६४ पासून दररोज १० दशलक्षमीटर पाणीपुरवठा करणाºया दाताळा मार्गावरील इरई नदीचा जलस्त्रोत प्रदूषित झाल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहेपाणीपुरवठा करणाºया तीन मोठ्या विहिरी इरई नदीपात्रात आहेत. यातून रामनगर जलशुद्धीकरण केंद्रावरुन शहरातील सुमारे ४० टक्के भागाला दररोज पाणीपुरवठा केला जातो. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या नदी पात्रामध्ये शहरातील कचºयापासून तर शासकीय व खासगी रुग्णालयातील घाणकपडे मोठ्या प्रमाणात या विहिरीजवळ धुण्यास आणल्या जात आहे. रुग्णालयातील कपड्यांमध्ये आॅपरेशनपासून ते गंभीर आजार असलेल्या रुग्णांचे कपडे व चादरींचे प्रमाण जास्त आहे. शहरात घाट नसल्यामुळे काही व्यावसायिक या ठिकाणी कपड्यांची धुलाई करतात त्यामुळे रुग्णालयातील कपड्यांची घाण व धुण्यासाठी वापरण्यात येणारे डिटर्जंट पावडर पाण्यात मिसळते. या मार्गावर बाजार समिती व एमआयडीसी असल्यामुळे येथे येणारी वाहनेदेखील याच पात्रात मोठ्या प्रमाणात धुण्यात येत आहेत. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया विहिरी भोवतालचे संपूर्ण पाण्याचे पात्र गटारीच्या पाण्यासारखे काळ झाले आहे. या घटनेकडे जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिका प्रशासनाने दूर्लक्ष करत आहे. जलबिरादरीने या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रक्रियेतून हे पाणी शुद्ध होत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा होणाºया भागातील आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची वेळ येऊ शकते, असा धोका जलबिरादरीचे जिल्हा संयोजक संजय वैद्य यांनी वर्तविला आहे.प्रतिबंधात्मक उपाययोजना करावीइरई नदीचे जलस्त्रोत प्रदुषित होत असल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. चंद्रपूर शहराची जलवाहिनी म्हणून ओळखणाºया इरई नदीचा नैसर्गिक पोत दिवसेंदिवस खराब होत आहे. यावर आळा घातला नाही, तर येणाºया काही वर्षांत नदीचे पाणी प्राशन करणे अशक्य होईल. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगर पालिका प्रशासनाने पाणी प्रदुषणाला प्रतिबंध घालावा, अशी मागणी जलबिरादरीने केली.