शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांना’ राष्ट्रपतींच्या भेटीचे आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:39 IST

चंद्रपूरच्या विविध आश्रमशाळेतील १० विद्यार्थी एव्हरेस्ट शिखरावर स्वारी करण्यासाठी सिध्द झाले आहेत. या १० विद्यार्थ्यांची केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रविवारी सकाळी विश्रामगृहावर भेट घेतली. त्यांना मोहीम फत्ते झाल्यानंतर राष्ट्रपतींची नवी दिल्ली येथे भेट घालून देण्यात येणार असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा पुढाकार : मोहीम फत्ते झाल्यावर दिल्लीत कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरच्या विविध आश्रमशाळेतील १० विद्यार्थी एव्हरेस्ट शिखरावर स्वारी करण्यासाठी सिध्द झाले आहेत. या १० विद्यार्थ्यांची केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रविवारी सकाळी विश्रामगृहावर भेट घेतली. त्यांना मोहीम फत्ते झाल्यानंतर राष्ट्रपतींची नवी दिल्ली येथे भेट घालून देण्यात येणार असल्याचे सांगितले.चंद्रपूरच्या बोर्डा, देवाडा व जिवती या तीन आश्रमशाळेतील १० आदिवासी विद्यार्थी १० एप्रिलपासून हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या बेस कॅम्पवरुन महिनाभराच्या एव्हरेस्ट मोहिमेला सुरुवात करणार आहेत. एक वर्षाच्या सात टप्प्यातील प्रशिक्षणानंतर ही मुले गिर्यारोहण मोहिमेसाठी सिध्द झाली आहे. या मोहिमेवर आश्रमशाळेतील आकाश चिन्नु मडावी, शुंभम रविंद्र पेंदोर, छाया सुरेश आत्राम, इंदू भाऊराव कन्नाके, कविदास पांडूरंग काटमोडे, मनिषा धर्मा धुर्वे, प्रमेश शिताराम आडे, आकाश मलाका आत्राम, उमाकांत सुरेश मडावी, विकास महादेव सोयाम हे विद्यार्थी जाणार आहेत. रविवारी येथील प्रियदर्शिनी सभागृहामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सकाळीच मुलांची भेट घेतली. त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. त्यांना एव्हरेस्ट मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केली. यावेळी महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, गोंदियाचे सीईओ राजा दयानिधी, प्रकल्प अधिकारी केशव बावनकर आदी उपस्थित होते.