शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धानोडे दाम्पत्याने दिला माणुसकीचा परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 22:05 IST

तालुक्यातील चंदनखेडा येथील शासकीय आश्रमशाळेतून निघून गेलेल्या १४ वर्षीय विद्यार्थी नागपूर येथील रेल्वेस्टेशन परिसरात आढळला.

ठळक मुद्देठाणेदारांकडून सत्कार : बेपत्ता झालेल्या बालकाला सुखरूप पोहोचविले

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथील शासकीय आश्रमशाळेतून निघून गेलेल्या १४ वर्षीय विद्यार्थी नागपूर येथील रेल्वेस्टेशन परिसरात आढळला. त्याच परिसरात हॉटेल चालविणाºया एका दाम्पत्याला त्या मुलावर संशय आल्याने त्याची विचारपूस करून त्याला त्या दाम्पत्याने मुलाला सोबत घेवून भद्रावती पोलीस स्टेशन गाठले व ठाणेदार बी.डी. मडावी यांच्या स्वाधीन करून माणुसकीचा परिचय दिला. त्या दाम्पत्यांची त्या बालकाविषयीची हुरहुर व आपुलकी लक्षात घेत ठाणेदार मडावी यांनी दाम्पत्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून त्यांच्यातील माणुसकीला दाद दिली.वरोरा तालुक्यातील आशी या गावातील रहिवाशी असलेला संकेत श्रीहरी उईके हा १४ वर्षीय बालक भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील शासकीय आश्रमशाळेत नवव्या वर्गात शिकत होता. तो ७ सप्टेंबरला रात्रीच्या वेळेस आश्रमशाळेतून निघून गेला. तो दिसला नाही तेव्हा तेथील अधीक्षकांनी त्याच्या गावी व इतरत्र शोध घेतला. परंतु, तो सापडला नाही. या घटनेची पोलिसात तक्रार करण्यात आली व सर्वत्र बेपत्ता झाल्याची चर्चा होती. संकेतने नागपूर येथील रेल्वेस्टेशन परिसरात काही दिवस आश्रय घेतला.जवळचे पैसे संपल्यानंतर त्याची उपासमार होऊ लागल्यानंतर त्याने ५ आॅक्टोबरला रेल्वेस्टेशन समोरच असलेल्या ओंकार दस्तुरी धनाडे व अर्चना ओंकार धनाडे या दाम्पत्याकडे जावून त्याने हॉटेलमध्ये कामाची मागणी केली. या दाम्पत्याने तू बाल कामगार असल्यामुळे तुला काम देता येणार नाही, असे म्हटले. मात्र त्यांना संशय बळावल्याने मुलाची सखोल चौकशी केली. तेव्हा तो विद्यार्थी निघून आल्याचे लक्षात आले.त्यांनी प्रसंगावधान राखून मुलाला इतरत्र न सोडता जेवण देवून त्याला सोबत घेवून ५ आॅक्टोबरला भद्रावती पोलीस स्टेशन गाठले. ठाणेदारांनी त्यांच्या आईला बोलाविले व स्वाधीन केले. धनाडे दाम्पत्यांच्या या माणुसकीने ठाणेदारही प्रभावित झाले व त्यांनी त्यांचा माणुसकीचा आदर करीत सत्कार केला. त्यावेळी ठाणेदार बी.डी. मडावी, पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार, सुनील इनमुलवार, महेंद्र इंगळे, भीमराव पडोळे तसेच मुलाची आई व त्याचे नातेवाईक मंडळींची उपस्थिती होती.