शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पिकांची रोवणी खोळंबली

By admin | Updated: August 29, 2015 01:19 IST

स्थानिक पिंपळगाव जिल्हा परिषद क्षेत्र हा धान व भाजीपाला पिकासाठी प्रसिद्ध आहे.

सिंचनाचीही सुविधा नाही : रोवणीनंतरही हवे पाणीपिंपळगाव : स्थानिक पिंपळगाव जिल्हा परिषद क्षेत्र हा धान व भाजीपाला पिकासाठी प्रसिद्ध आहे. धानाची रोवणी करण्यासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. परंतु मागील कित्येक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कित्येकांची रोवणी खोळंबली आहे. बहुतांश रोवणी झालेल्या शेतात भेगा पडून धान पिकाला सुवाऱ्या वळल्याने आता धानाचे पिक पाण्याअभावी करपणार म्हणून पिंपळगाव जि.प. क्षेत्रातील शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे.जून महिन्यात पिंपळगाव परिसरात संततधार पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी धानपऱ्हे शेतात टाकणे सुरु केले. त्यामुळे यावर्षी तरी पाऊस भरपूर येणार व आम्ही सुखी होणार या आशेवर शेतकरी आनंदात दिसत होता. मात्र पऱ्हे टाकून झाल्यावर तुरळक पाऊस आला. पऱ्हे चांगले अंकुरले. आज ना उद्या पाऊस येईल म्हणून शेतकरी बेरीज-वजाबाकी करीत राहिला. पाऊस आला पण पाहिजे तेवढा दमदार स्वरुपात आला नाही. तरीही जेवढे आहे, त्याच्यातच जसे होईल तसे धानाच्या पऱ्ह्यांची रोवणी केली.या परिसरात कोणतेच पाणी साठविण्याचे साधन नाही. मात्र विहिरी भरपूर असून त्याही अखेरच्या घटका मोजत आहेत. विहिरीची पाण्याची पातळी प्रचंड खोल गेली आहे. जमिनीच्या २०० ते ३०० फूटाच्या खालीही पाण्याचा पत्ता नसल्याने विहीरी व पंपाच्या भरवशावर धानाची रोवणी करणारे आता निसर्गावर अवलंबून असून आज ना उद्या तरी पाऊस येईल व आपल्या शेतातील भरपूर उत्पादन येईल या आशेवर आहे. धान उत्पादक शेतकरी मिळेल त्या मार्गाने पैसे काढून एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च करीत आहे. आपल्याला मेहनतीचे फळ आज ना उद्या मिळेल म्हणून अंक गणित जोडत असून पूर्ण वर्षाचा आराखडा आखून तो पावसाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु निसर्ग मात्र कोणत्या न कोणत्या रुपाने शेतकऱ्यावर कोपतानाच दिसत आहे.अद्यापही पिंपळगाव परिसरात पावसाअभावी धानाच्या पऱ्ह्याची रोवणीची कामे खोळंबली आहेत. धानाचे पिक कसे येणार, ही चिंता आहेच. येत्या काही दिवसात पावसाच्या जोरदार सरीची आवश्यकता असून रोवणी झाल्यावरही पिकाला पाणी भरपूर लागणार आहे. असे झाले नाही तर शेतकऱ्याचे हाल होण्याचे भयावह चित्र आताच दिसू लागले आहे. उन्हाळी धान पिक शेतकऱ्यांच्या हातून गेले. दु:खाचे अश्रु सुकण्याअगोदर पुन्हो डोळ्यात अश्रु येण्याचे वेळ आली आहे. परिसरातील धान उत्पादक पाणावलेल्या डोळ्यांनी आभाळाकडे पाहत आहे. (वार्ताहर)