शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिव्हल

By admin | Updated: February 12, 2017 00:35 IST

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय आणि स्थानिक राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ...

२४, २५ व २६ फेब्रुवारी : नवोदितांना चित्रीकरण प्रशिक्षणाला प्रवेशचंद्रपूर : केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय आणि स्थानिक राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुरात प्रथमच आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिव्हल २४, २५ व २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातील ख्यातीप्राप्त व्यक्तींच्या उपस्थितीत अनेक मानांकित दर्जेदार माहितीपट, नाणेसंग्रह, वन्यजीव छायाचित्रण अशा प्रदर्शनासोबतच आॅटो एक्सपो, मोबाईल एक्सपो आदी कार्यक्रम होणार आहेत.चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात प्रथमच आयोजित होणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवात माहितीपट निर्मिती क्षेत्रात संधी शोधणाऱ्या कलावंतांना दोन दिवसीय प्रशिक्षण तसेच कार्यशाळेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी आयोजकांच्या आग्रही भूमिकेतून मिळत आहे.महोत्सवात ख्यातनाम व्यक्तींच्या मार्गदर्शनाबरोबरच दर्जेदार चित्रिकरणाचे कौशल्य विकसित करण्याच्या तंत्रासाठी प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रवेश मिळणार आहे.या महोत्सवासाठी दिग्गज तज्ज्ञ मंडळी येत असून प्रशिक्षणार्थींची संख्या मर्यादित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे चित्रिकरणाचे किमान ज्ञान आणि डॉक्युमेंटरी (माहितीपट) तथा अ‍ॅनिमेशन संबंधी पूर्व अनुभव किंवा या क्षेत्रात प्रयत्नशील असलेल्यांना विशेषत: कला संबंधीत क्षेत्रातील पदवी-पदविका असणाऱ्यांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे.या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग घेण्यास इच्छूक असणाऱ्यांनी स्वत:च्या संपूर्ण माहितीसह व यापूर्वी या क्षेत्रात काम केले असल्याचा पुरावा सादर करून महोत्सवाचे मुख्य संयोजक राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, यांच्याकडे २० फेब्रुवारी किंवा तत्पूर्वी साधा अर्ज करावा. उपलब्ध अर्जातून छाननी करून प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)