शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेची अंतर्गत रस्त्यांची कामे कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST

चार वर्ष लोटले तरी कामे सुरूच : कंत्राटदाराची मनमानी नागभीड : गेल्या चार वर्षांपासून नगरपरिषदेच्या अंतर्गत रस्त्यांचे काम ...

चार वर्ष लोटले तरी कामे सुरूच : कंत्राटदाराची मनमानी

नागभीड : गेल्या चार वर्षांपासून नगरपरिषदेच्या अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू आहे. मात्र ते काम संपायचे नाव घेत नाही. कंत्राटदारापुढे येथील सार्वजनिक बांधकाम विभागासह नगरपरिषद ही हतबल झाली आहे. या रस्त्यांमुळे सामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल येथे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीच्या काळात बनविण्यात आलेल्या नागभीडच्या रस्त्यांची एकंदर हालत लक्षात घेऊन या रस्त्यांचे पुनरूज्जीवन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. याठिकाणी नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर वर्षभरातच लोकनियुक्त कार्यकारी मंडळ पदारूढ झाले. या कार्यकारी मंडळाने हे रस्ते आणि नालीच्या कामास प्राधान्य देऊन ही कामे अग्रक्रमाने प्रस्तावित केली. शासनाकडूनही या रस्त्यांसाठी व नाल्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला. मात्र आश्चर्याची बाब अशी की,निधी मंजूर झाल्यानंतरही प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कामास सुरूवात करण्यात आली. येथील सिनेमा चौकापर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले. आता नुकतेच येथील जुन्या गो. वा. महाविद्यालयापासून तर गोरोबा चौकातील रस्ता पूर्ण आणि जुन्या कन्या शाळेकडे जाणारा रस्त्याचे काम अर्धवट करण्यात आले. उर्वरित रस्त्यांच्या कामाचा अद्यापही ठावठिकाणा नाही.

सद्यस्थितीत या रस्त्यांची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. परिणामी रस्त्यांनी ये जा करताना नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच या रस्त्यांवरून जड वाहनांची ये जा सुरू राहत असल्याने या त्रासात आणखीच भर पडत आहे.

ही अवस्था केवळ एकाच रस्त्याची नाही तर नागभीडमधल्या बहुतेक रस्त्यांची आहे. आता तर या रस्त्यांवर चांगलेच खड्डेही पडले आहेत.या अर्धवट कामामुळे लहान लहान अपघातही घडल्याची माहिती आहे. सा. बां. विभागाने कंत्राटदारास आणि नगरपरिषद प्रशासनाने सा. बां. विभागास खरोखरच धारेवर धरून काम करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोट

सा. बां. विभागाने कंत्राटदारावर वेळीच कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती. केवळ सा. बां. विभागाच्या दिरंगाईमुळे हा प्रकार घडत आहे. सा. बां. विभागाने कंत्राटदाराकडून काम काढून ते नगरपरिषदेकडे सोपवावे. नगरपरिषद चार महिन्यात काम पूर्ण करेल. या कामात नगरपरिषदेला नाहक मुस्कटदाबी सहन करावी लागत आहे.

- सचिन आकूलवार, बांधकाम सभापती.

कोट

नागभीडच्या रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. याला जबाबदार कंत्राटदार तर आहेच, पण त्याचबरोबर सा. बां. विभाग व न. प. प्रशासनही जबाबदार आहे. कंत्राटदार बदला अशा सूचना वारंवार केल्या आहेत. पण न. प. प्रशासन कंत्राटदाराविरोधात शब्दही काढायला तयार नाही.

- प्रतीक भसीन , नगरसेवक,नागभीड.