शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मध्यावधी निवडणूक होणे अटळ

By admin | Updated: November 29, 2014 01:05 IST

राज्यात भाजपाचे सरकार बहुमतात नाही. पण, बहुमतात असल्याचा आव आणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य कारभार चालवीत आहेत.

बल्लारपूर : राज्यात भाजपाचे सरकार बहुमतात नाही. पण, बहुमतात असल्याचा आव आणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य कारभार चालवीत आहेत. मात्र, दुबळे व अधांतरीसरकार कधीही पडून मध्यावधी निवडणूक होऊ शकते. त्यामुळे आपणाला नव्या दमाने आणि विजयी होऊच, या इर्षेने आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागायचे आहे व पुन्ही सत्ता काबीज करायची आहे, असे सांगून यापुढे राज्यात नक्की आपलीच सत्ता येणार, असा ठाम विश्वास विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते व ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.आ. वडेट्टीवार हे विधानसभेत काँग्रेस पक्षाचे उपनेते झालेत त्यानिमित्त त्यांचा बल्लारपूर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. स्थानिक महात्मा गांधी पुतळ्याजवळ झालेल्या या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष डॉ. रजनीताई हजारे होत्या. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, कविता खरतड, बल्लारपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष घनशाम मुलचंदानी, दिलीप माकोडे, जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष आबीद अली, चंद्रपूर महानगरपालिकेचे सभापती रामू तिवारी, सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष कमलेश शुक्ला, मेघा भाले, चंद्रपूर न.प. चे गटनेता संतोष लहामगे, शांता बहुरिया, भास्कर माकोडे, हरिश गेडाम, फारूखभाई आदींची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. शाल व श्रीफळ देऊन वडेट्टीवार यांचा सत्कार करण्यात आला. भाजपाने आपल्या एक महिन्याच्या शासन काळात जनतेला कसे निराश केले, याची जंत्री वडेट्टीवार यांनी मोठ्या खुबीने मांडली. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विरोधात असताना, त्यांनी ५४० पत्र विविध मागण्यांसंबंधात दिले होते व त्याकरिता आंदोलनाची भाषा ते बोलत होते. त्या मागण्या पूर्ण करण्याची पाळी आज त्यांच्यावर आली आहे. भाजपा सत्तेवर बसल्यानंतर त्यातील वा इतर कोणतीही मागणी त्यांनी पूर्ण केली नाही व करूही शकणार नाही. सत्तेवर नसतांना काहीही बरळता व मागता येते. सत्तेवर आल्यानंतर ते करता येत नाही हे भाजपाच्या नेत्यांना आता कळू लागले आहे. असा टोला त्यांनी मुनगंटीवार यांना मारला. एलबीटी, टोलमुक्ती या सर्व बाबींवर भाजपा आता घुमजाव करीत आहे, याचा विचार लोकांनी करायला हवा आणि या सरकारला जाब विचारायला हवा असे ते म्हणाले. (शहर प्रतिनिधी)