शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 22:39 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांशी मंत्रालयातील स्टुडिओमधून संपर्क साधला. चंद्रपूर जिल्ह्यातील २१ लाभार्थ्यांनी यावेळी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीत योजनेच्या अंमलबजावणीविषयी माहिती दिली. स्वत:चे हक्काचे घर मिळाल्याबद्दल जनतेमध्ये या योजनेबद्दल प्रचंड आपुलकी दिसून आलीे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील २१ लाभार्थी : विविध विषयांवर केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांशी मंत्रालयातील स्टुडिओमधून संपर्क साधला. चंद्रपूर जिल्ह्यातील २१ लाभार्थ्यांनी यावेळी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करीत योजनेच्या अंमलबजावणीविषयी माहिती दिली. स्वत:चे हक्काचे घर मिळाल्याबद्दल जनतेमध्ये या योजनेबद्दल प्रचंड आपुलकी दिसून आलीे.चंद्रपूर जिल्ह्यातील महानगर क्षेत्रातील महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी तसेच राजुरा व वरोरा नगरपालिकेच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांचा यात सहभाग होता. तसेच योजनेमध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, तसेच शबरी आवास योजना व रमाई आवास योजना यालाही उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. या सर्व लाभार्थ्यांनी महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांमध्ये या योजनेला मिळालेल्या लाभाच्या यशकथा ऐकता आल्या. मुख्यमंत्र्यांनी दोन तासांच्या अवधीमध्ये १० जिल्ह्यांच्या लाभार्थ्यांसोबत यावेळी चर्चा केली. वेळेच्या कमतरतेमुळे अनेक जिल्हयांसोबत त्यांची चर्चा होऊ शकली नाही. तथापि, या योजनेमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांनी सर्व लाभार्थ्यांचे आभार मानले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबद्दल घेतलेल्या पुढाकाराने अनेकांना आपल्या हक्काचे घर मिळविण्याचे स्वप्न पूर्ण करता आले असल्याचे यावेळी लाभार्थ्यांसोबतच्या चर्चेत पुढे आले. प्रत्येकाची घर मिळण्याची स्वतंत्र कहाणी होती. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी काही भेट वस्तूसुद्धा आणल्या होत्या. तत्पूर्वी आज सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी लाभार्थ्यांसोबत संवाद साधला. लाभार्थ्यांना या योजनेसंदर्भात कुठलीही अडचण असल्याबाबत विचारणा केली. लाभार्थ्यांच्या संवाद कार्यक्रमानंतर त्यांना सहभागी झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.हे होते लाभार्थीया लोकसंवादमध्ये सहभागी झालेल्या लाभार्थ्यांची नावे सुशिला रामभाऊ झाडे, ताई गुलाब कार्लेकर, करिमाबी अब्दुल जलील कुरेशी, रजनी संजय बारस्कर, नंदा शंकर जुमडे, गजानन आकनूरवार, चक्रधर उपासे, भिमराव माटे, नामदेव शेंडे, अनिल सतीमेश्राम, सरिता जतीन आकनूरवार, शितल कोंडू नरड, संगिता अनिल भटारकर, जमुना जीवनदास उपरे, कविता कवडू पचारे, किशोर निमगडे, छाया श्रीनिवास निमगडे, प्रशांत सुखदेवे, मनोहर मेश्राम, चरित्र चौधरी व अरविंद परचाके यांनी सहभाग घेतला होता. लाभार्थ्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी उपलब्ध केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.