शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अंतरगाव - निमगाव क्षेत्र विकासापासून उपेक्षित

By admin | Updated: June 17, 2016 01:10 IST

अंतरगाव-निमगाव जिल्हा परिषद क्षेत्र धान उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जाते. मात्र सिंचनाचा अभाव,

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : आश्वासने दिल्यानंतर त्याची पूर्तता नाहीगेवरा : अंतरगाव-निमगाव जिल्हा परिषद क्षेत्र धान उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जाते. मात्र सिंचनाचा अभाव, निसर्गाचा लहरीपणा, शेतकऱ्यांचे मागील चार वर्षांपासून बिघडलेले अर्थकारण आणि या भागातील लोकप्रतिनिधींची शेतकऱ्यांप्रति तुटलेली नाळ, या सर्व कारणांंमुळे हे क्षेत्र विकासापासून कायम उपेक्षित आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल या भागातील शेतकरी उपस्थित करू लागला आहे.या जिल्हा परिषद क्षेत्रात दोन पंचायत समिती क्षेत्र असून दोन पक्षाचे पंचायत सदस्य आहेत. निमगाव पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस तर अंतरगाव - पालेबारसा भाजप आणि जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचा आहे. मागील कित्येक वर्षाचा विधान सभेचा राजकीय आलेख बघितल्यास राज्यात ज्या पक्षाची सत्ता असते, त्याच्या विरुध्द पक्षाचे या क्षेत्राचे आमदार असतात. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी समांतर राजकीय व्यासपीठ नाही. तरीही पक्षीय राजकारण करून शेतकऱ्यांना भुरळ घातली जाते. आपल्या पक्ष कार्यात त्यांना ओढून मागे मागे धावत ठेवले आहे. या भागातील स्वत:ला राजकीय कार्यकर्ते म्हणवून घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती विसरून राजकीय चष्मा वापरणे सुरू केले आहे. त्यामुळे तो दुखणं विसरुन राजकीय गुलाल उधळण्यातच धन्यता मानू लागला. हळूहळू राजकीय सत्तेच्या मोहापोटी या भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगिण प्रश्नांवर काम करण्याचे साधे सौदार्ह दाखवू शकले नाहीत. त्यामुळे या भागातील राजकर्त्यांची राजकीय प्रतिमा फारशी उजळू शकली नाही. येथील मतदार जनता ओरडू लागली आहे. या भागातील शिक्षण, आरोग्य, सिंचन व्यवस्था, यामुळे शेतकऱ्यांच्या अंंधारलेल्या वाटा आता अधिकच काळोखमय झाल्या आहेत. यावर्षी आसोला मेंढा तलावात गोसेखुर्दचे पाणी अंतरगाव - पालेबारसा या पंचायत समिती क्षेत्रातून मुख्य कालव्याद्वारे सोडण्यात आले. त्याचा फायदा कोणत्याही गावांना झाला नाही. उलट आणेवारीचा परिणाम महसुली परिमंडळामुळे येथील १५ ते १६ गावांना सोसावा लागत आहे. त्याच सोबत निमगाव- विहिरगाव पंचायत समिती क्षेत्रातील सहा गावांना व्याहाड परिमंडळामुळे कायम त्रास सोसावा लागतो. अर्थात पाथरी, राजस्व परिमंडळ आसोला तलाव, व्याहाडच्या लाभ क्षेत्राबाहेरही जि.प. क्षेत्र मोडत असल्याने खऱ्या अर्थाने आतापर्यंत कोणत्याही स्थानिक पंचायत समिती, जिल्हा परिषद व विधानसभेच्या प्रतिनिधीने या भागातील हा अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळण्यासाठी आपली राजकीय ताकद वापरली नाही. कोणत्याही शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे सोयरसुतकच लोकप्रतिनिधींना असल्याचे दिसून येत नाही. या सर्व परिस्थितीवर आता लक्ष केंद्रीत करुन येणाऱ्या आगामी जि.प., पंचायत समिती निवडणुकांत गुडघ्याला बांशिग बांधून असणारे आणि ज्यांची कारकिर्द आता संपुष्टात येणार आहे, त्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची योग्य वेळ येवून ठेपली आहे. विद्यमान आमदारांनी तरी या क्षेत्राकडे गांभीर्याने बघून विकास साधावा, अशी अपेक्षाही जनता व्यक्त करीत आहे. (वार्ताहर)