शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वनजमिनी हस्तांतरणाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:30 IST

विहीरगाव व मूर्ती येथे महाराष्‍ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ग्रीनफिल्ड विमानतळ उभारणी संदर्भात वनजमिनींच्‍या हस्‍तांतरणाबाबत विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्‍या विनंतीनुसार वनराज्‍यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी मंत्रालयात बैठक बोलाविली होती. या बैठकीला विमानतळ विकास कंपनीचे दीपक कपूर, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक (वन्‍यजीव) नितीन काकोडकर, मुख्‍य वनसंरक्षक मंत्रालय अरविंद आपटे  उपस्थित होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांची माहिती : प्रस्‍तावित ग्रीनफिल्ड विमानतळ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा तालुक्‍यातील विहीरगाव व मूर्ती येथे महाराष्‍ट्र विमानतळ विकास कंपनीकडून उभारण्‍यात येणाऱ्या प्रस्‍तावित ग्रीनफिल्‍ड विमानतळासाठी वनजमिनी हस्‍तांतरणाचा प्रस्‍ताव मुख्‍यमंत्र्यांकडे फेरसादर करावा, असे निर्देश वन तसेच सामान्‍य प्रशासन राज्‍यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वनविभागाच्‍या उच्‍चाधिकाऱ्यांना शुक्रवारी दिले.विहीरगाव व मूर्ती येथे महाराष्‍ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ग्रीनफिल्ड विमानतळ उभारणी संदर्भात वनजमिनींच्‍या हस्‍तांतरणाबाबत विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्‍या विनंतीनुसार वनराज्‍यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी मंत्रालयात बैठक बोलाविली होती. या बैठकीला विमानतळ विकास कंपनीचे दीपक कपूर, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक (वन्‍यजीव) नितीन काकोडकर, मुख्‍य वनसंरक्षक मंत्रालय अरविंद आपटे  उपस्थित होते. या बैठकीत आमदार मुनगंटीवार यांनी विषयाबाबत सविस्‍तर भूमिका विषद केली. ग्रीनफिल्‍ड विमानतळ उभारणीच्‍या दृष्‍टीने  सामान्‍य प्रशासन विभागाने प्रस्‍तावित विमानतळाच्‍या विकासकामांना प्रशासकीय व वित्तीय मान्‍यता दिली आहे. वनजमिनी हस्‍तांतरणाचा प्रस्‍ताव शासनाला सादर करण्‍यात आला आहे, परंतु हा प्रस्‍ताव व्‍यवहार्य नसल्‍याचे वनविभागाने म्‍हटले आहे.  विमानतळाची उभारणी झाल्‍यास   विकासाला चालना मिळेल. याबाबत फेरप्रस्‍ताव केंद्र शासनाकडे पाठविण्‍याची गरज आहे. याप्रकरणी  शासनाने कार्यवाही करण्‍याची मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केली. सदर प्रकरणी  फेरप्रस्‍ताव शासनाने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्‍याच्‍या दृष्‍टीने नस्‍ती मुख्‍यमंत्र्यांकडे  सादर करावी, मुख्यमंत्र्यांना याबाबत विनंती करू, असे वनराज्‍यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले.

नागरिक व महसूलच्या जमिनी भूसंपादितविहीरगाव व मूर्ती येथे उभारण्‍यात येणाऱ्या प्रस्‍तावित ग्रीनफिल्‍ड विमानतळासाठी नागरिकांच्या शेतजमिनी व महसूल विभागाच्या जमिनी आधीच भूसंपादित करण्यात आल्या आहेत. यासाठी नागरिकांना प्रति एकर आठ लाख रुपये मोबदला देण्यात आला आहे. आता केवळ वनजमिनीचाच प्रश्न रेंगाळला आहे. 

 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार