शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 05:00 IST

सध्या सोयाबीनचे भाव वाढले आहे. विशेषत: काही ठिकाणी ११ हजार रुपयांपर्यंत भाव गेले आहे. मागील काही वर्षांत जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मात्र ऐन हंगामात पावसाचा फटका बसतो. शिवाय सोयाबीनचे तेल ते वाण घेतल्याने उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळे या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी लवकर व मध्यम कालावधीत येणाऱ्या वाणाची लागवड केली आहे. कमी कालावधीत येणारे सोयाबीन लवकरच शेतकऱ्यांच्या हातात पडणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कमी दिवसांत उत्पन्न हाती येईल, अशा नवनवीन वाणांकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे या वर्षी लवकर येणाऱ्या सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. सोयाबीन लवकर हाती आल्यास भाववाढीचा लाभही शेतकऱ्यांना  मिळणार आहे.सध्या सोयाबीनचे भाव वाढले आहे. विशेषत: काही ठिकाणी ११ हजार रुपयांपर्यंत भाव गेले आहे. मागील काही वर्षांत जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. मात्र ऐन हंगामात पावसाचा फटका बसतो. शिवाय सोयाबीनचे तेल ते वाण घेतल्याने उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळे या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी लवकर व मध्यम कालावधीत येणाऱ्या वाणाची लागवड केली आहे. कमी कालावधीत येणारे सोयाबीन लवकरच शेतकऱ्यांच्या हातात पडणार आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून नुकसानीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना या वर्षी थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शेतकरी म्हणतात...

कमी कालावधीत येणारे सोयाबीन घेतल्यामुळे अनेक फायदा आहेत. परतीच्या पावसापासून नुकसान टाळले जाऊ शकते. तसेच बाजारभावही चांगला मिळतो. त्यामुळे कमी कालावधीत येणाऱ्या या सोयाबीन पेरणीला शेतकऱ्यांची पसंती आहे.- चेतन बोबाटे, शेतकरी

काही वर्षांपासून पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे. या वर्षी पीक चांगले आहे. कमी दिवसांत येणाऱ्या सोयाबीनला चांगले दर मिळत आहे. काही दिवसांत मध्यम कालावधीतील सोयाबीन बाजारात येईल. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना फायदा होण्याची आशा आहे.-भास्कर जुनगरी, शेतकरी

झटपट येणारे सोयाबीन

 १०० ते १०५ दिवसांमध्ये येणारे सोयाबीनचे वाण विकसित झाले आहे. हे वाण झटपट येत असल्याने सोयाबीनच्या दरवाढीचा फायदा होत आहे.

मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन

सोयाबीनचे मध्यम कालावधीत येणारे वाण १०५ ते १२० दिवसांमध्ये येते. या खरिपात मध्यम कालावधीतील सोयाबीन अद्याप बाजार समितीत येण्यास आणखी काही दिवस बाकी आहे.

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन

सोयाबीनच्या काही वाणांना जास्त कालावधी लागतो. या सोयाबीनला चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागतो. या सोयाबीनला परतीच्या पावसाचा धोका असतो. तसेच रब्बी हंगामात पेरणीसाठी जमीन सज्ज ठेवण्यासही विलंब होतो.

 

टॅग्स :agricultureशेती