शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा मुक्तीसंग्राम लढ्याच्या इतिहासातून प्रेरणा घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:24 IST

हैदराबाद संस्थानावरील निजामांचे राज्य उलथवण्यासाठी व निजामाहीच्या अत्याचारातून लोकांना मुक्ती देण्याकरिता हजारो नागरिकांनी राजुरा मुक्ती संग्रमाचा लढा निर्धाराने लढला.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे प्रतिपादन : जिवती येथे पार पडले ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : हैदराबाद संस्थानावरील निजामांचे राज्य उलथवण्यासाठी व निजामाहीच्या अत्याचारातून लोकांना मुक्ती देण्याकरिता हजारो नागरिकांनी राजुरा मुक्ती संग्रमाचा लढा निर्धाराने लढला. स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ , रवि नारायण रेड्डी, भाऊसाहेब वैशपायम व अनेक सेनानीच्या नेतृत्वात लढलेल्या या लढ्यामुळे या संस्थानातील अनेक शहरे, गावे निजाम संस्थानातून मुक्त झाली. हे स्वातंत्र्य चिरायू होण्यासाठी विद्यमान पिढीने प्रेरणा घेत सर्वांनी बंधूभाव व ऐक्याची भावना बाळगून विकास समृध्द असा नवभारत घडविण्याचे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.राजुरा मुक्तीसंग्राम सोहळ्यानिमित्त जिवती येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रविवारी जिवती येथील बसस्थानक परिसरात केंद्रीय गृह राजयमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहन पार पडले. याप्रसंगी जिवती भाजप तालुकाध्यक्ष केशवराव गिरमाजी, जि.प. महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, पं.स. सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते, भाजप उपाध्यक्ष अरूण मस्की, जिल्हा किसान आघाडीचे महामंत्री राजू घरोटे, भाजप महामंत्री सुरेश केंद्रे, पृथ्वीनाथ चव्हाण, उपाध्यक्ष दत्ता राठोड, जि.प. सदस्य कमलाबाई राठोड, राजेश राठोड, नगरपंचायत सदस्य अनुसयाबाई राठोड, सुंदरबाई राठोड, किरण चौहाण, जिवतीचे तहसिलदार, जि. प., पं. स. सदस्य व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमात केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जंगली श्वापदांपासून शेतीचे नुकसान झालेल्या शेतकºयांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.