शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतप ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
5
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
6
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
7
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
8
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
10
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
11
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
12
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
13
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
14
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
15
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
16
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
17
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
18
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
19
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
20
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

वाघपीडित गावाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By admin | Updated: August 7, 2014 23:52 IST

पोंभुर्णा तालुक्यातील घनोटी तुकूम या वाघपीडित गावाला आज गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. तेथील परिस्थितीची पाहणी करीत नागरिकांशी चर्चाही केली. नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात येईल,

गावकरी दहशतीतच : नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याचे आश्वासनचंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील घनोटी तुकूम या वाघपीडित गावाला आज गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. तेथील परिस्थितीची पाहणी करीत नागरिकांशी चर्चाही केली. नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले.२५ जुलै रोजी वाघाच्या हल्ल्यात घनोेटी तुकूम येथील पांडुरंग दोनू आत्राम या नागरिकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी या गावास भेट दिली. यापूर्वी या परिसरात वाघाच्या हल्ल्यात देवई येथील वत्सलाबाई शेडमाके या महिलेचा मृत्यू झाला होता.घनोेटी तुकूम येथील समाज भवन येथे त्यांनी पांडुरंग आत्राम यांच्या पत्नी ताराबाई, मुलगा पुरुषोत्तम व सरपंच सातपुते व गावकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या ४० अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या ५ चमू तयार करण्यात आल्याचे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला असून वाघ कोणत्याही क्षणी पकडल्या जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी गावकऱ्यांनी मदत व सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळालासुद्धा भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीवरुन वनविभागाच्या अधिकाऱ्यांची ग्रामपंचायत भवन येथे राहण्याची सोय गावकऱ्यांनी केली. (शहर प्रतिनिधी)