शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिपरीचा अनुप झाला विक्रीकर निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:48 IST

सध्या स्पर्धेचे युग आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळेलच याची शाश्वती उरलेली नाही. मात्र, यशाचे शिखर गाठण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि अभ्यासात सातत्य ठेवल्यास कोणतेही ध्येय गाठणे कठीण नाही, हे गोंडपिपरीच्या अनुपने दाखवून दिले आहे.

ठळक मुद्देजिद्द, चिकाटी ठरली मोलाची : अथक परिश्रमाने मिळाले यश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या स्पर्धेचे युग आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळेलच याची शाश्वती उरलेली नाही. मात्र, यशाचे शिखर गाठण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि अभ्यासात सातत्य ठेवल्यास कोणतेही ध्येय गाठणे कठीण नाही, हे गोंडपिपरीच्या अनुपने दाखवून दिले आहे. त्याने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेली विक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली.मुळचा गोंडपिपरी येथील रहिवासी असलेल्या अनुप मुरलीधर भोयर याने १३५ गुण मिळवित विक्रीकर निरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २५१ विक्रीकर निरीक्षकाच्या पदाकरिता काही दिवसांपुर्वी परीक्षा पार पडली. २ मे रोजी या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात अनुपने यश संपादन करीत जो स्पर्धेत टिकेल, तोच यशाला गवसणी घालेल, हे दाखवून दिले.अनुपचे वडील मुरलीधर भोयर हे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आहेत. अनुपचे पहिले ते बारावीपर्यंतचे शिक्षण गोंडपिपरी येथे झाले. त्यानंतर त्याने गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे वास्तव्यास राहून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर तो पुणे येथे खासगी शिकवणी लावून स्पर्धा परिक्षेची तयारी करीत होता. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अभ्यास करीत असताना त्याने अनेक विभागाची परीक्षा दिली. मात्र अपयशच आले. यानंतरही अनुप खचून गेला नाही. त्याने अभ्यास सुरूच ठेवला आणि लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मुलाच्या यशाने वडील भारावून गेले असून ही बातमी कानावर पडताच मित्र मंडळीनी फटाके फोडून आनंद साजरा केला.सध्या बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. प्रत्येक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात असून अनेक जण गाव सोडून शहरातील अभ्यासिकेत तासन्तास अभ्यास करताना दिसतात. मात्र दोन-चार वर्षे अभ्यास करूनही यश न आल्याने काही जण लघु उद्योगाकडे वळले आहेत. मात्र ध्येय गाठण्यासाठी सततचे अपयश पचवून यश मिळविणारच, असा ठाम निश्चय करून अभ्यासात सातत्य ठेवल्याने आपण लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करू शकलो, अशी प्रतिक्रिया अनुप भोयरने ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.