शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल अ‍ॅपद्वारे होणार पाण्याची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:13 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींमधील सर्व पाणी स्त्रोतांची तपासणी आता जिल्हा परिषद मोबाईल अ‍ॅपद्वारे करणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत पाण्याचे नमुने व पाणी स्त्रोतांची या द्वारे तपासणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देजि.प.चा उपक्रम : जिपीएस प्रणालीद्वारे एकाच ठिकाणी मिळणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींमधील सर्व पाणी स्त्रोतांची तपासणी आता जिल्हा परिषद मोबाईल अ‍ॅपद्वारे करणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत पाण्याचे नमुने व पाणी स्त्रोतांची या द्वारे तपासणी केली जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे वर्षातून दोन वेळा रासायनिक व जैविक पाणी नमुने तपासणी पावसाळयापूर्वी व पावसाळयानंतर केली जाते. पावसाळयापूर्वी मार्च ते मे व पावसाळयानंतर आक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत ही पाणी नमुने तपासणी केली जाते. ग्रामीण भागातील पाणी स्त्रोत दूषित होऊ नये आणि झालेच तर त्यावर उपाययोजना लवकरात लवकर व्हावी, याकरिता तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांना स्वच्छ, शुध्द व शाश्वत पाणी मिळावे, याकरिता शासनाकडून वेळोवेळी उपाययोजना केली जाते.यात ही पाणी नमुने तपासणी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील जिल्ह्यात असलेल्या सात प्रयोगशाळेत केली जात असते. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग मोबाईल अप्लीकेशन सेंटर, नागपूर यांच्या मार्फत जिल्हयातील सर्व स्त्रोतांचे अक्षांश व रेखांश यांची गाव व ठिकाण अशी अचुक माहिती मोबाईल अप्लीकेशनद्वारे घेण्यात आलेली आहे. स्त्रोतांची परिपूर्ण माहिती १ आक्टोंबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यान जिल्ह्यातील सर्व स्त्रोतांचे पाणी नमुने ग्रामसेवक व जलसुरक्षक यांच्या मदतीने गोळा करण्यात येणार आहेत.पाणी पुरवठा योजना, विहीर, हातपंप तसेच बंद पडलेले स्त्रोत अशा एकूण १४ हजार ९७१ स्त्रोतांबद्दलची माहिती एकाच वेब पोर्टलवर ठेवण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींमधील कार्यरत ग्रामसेवक, पंचायत समिती अंतर्गत असणारे समूह समन्वयक व गट समन्वयक, जलसुरक्षक, जिल्ह्यातील पाणी गुणवत्ता सल्लागार व ग्रामलेखा सल्लागार यांना मोबाईल अ‍ॅप हाताळणीचे प्रशिक्षण जिल्हा पाणी गुणवत्ता कक्षामार्फत देण्यात आले आहे. ग्रामसेवक, जलसुरक्षक किंवा संबधित अधिकारी हे त्या स्त्रोताजवळ जावून मोबाईल अ‍ॅपद्वारे त्याची नोंद करुन पाणी नमुने गोळा करुन ते नजिकच्या प्रयोगशाळेत पोहते करुन देतील.यामुळे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणचे पाणी नमुने दूहित आहेत, कोणते पाणी नमुने पाणी गुणवत्ता पूर्ण आहेत, याची अचुक माहिती या अ‍ॅपमुळे मिळणे सोईस्कर होणार आहे.या मोबाईल अ‍ॅपमध्ये सर्व गावातील पाणी स्त्रोतांची अघावत माहिती आहे. या अ‍ॅपचा वापर करताना मोबाईल डाटा व जीपीएस प्रणाली सुरु केल्यानंतर स्त्रोतांच्या १० मीटरच्या अंतरामध्ये गेल्यानंतर त्याचा रंग बदलत जातो. त्यानंतर संबधित व्यक्ती त्या स्त्रोतांचे फोटो काढून स्त्रोतात पाणी आहे का, स्त्रोत चालु किंवा बंद आहे, हे अ‍ॅपद्वारे दर्शविता येते. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी स्त्रोतांची तपासणी सोईस्कर व अघावत होणार आहे.-ओमप्रकाश यादव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी,(पाणी व स्वच्छता), जि.प. चंद्रपूर.