शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाहीत कृषी विद्यापीठासाठी राज्यस्तरीय चमूकडून पाहणी

By admin | Updated: August 10, 2015 00:43 IST

राज्य शासनाकडून विदर्भात कृषी विद्यापीठ देण्याचे जाहीर करण्यात आले असून शनिवारी शासनाने नियुक्त केलेल्या नऊ सदस्यीय समितीने सिंदेवाही येथे भेट देऊन पाहणी केली.

सिंदेवाही : राज्य शासनाकडून विदर्भात कृषी विद्यापीठ देण्याचे जाहीर करण्यात आले असून शनिवारी शासनाने नियुक्त केलेल्या नऊ सदस्यीय समितीने सिंदेवाही येथे भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.सिंदेवाही येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र आहे. याअंतर्गत चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. शासनाने सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ सुरू करावे, यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने विदर्भात कृषी विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सदर विद्यापीठ सिंदेवाही येथेच सुरू करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडूनही केली जात आहे. शनिवारी राज्य शासनाने कृषी विद्यापीठ निर्मितीसाठी गठित केलेल्या नऊ सदस्यीय समितीने येथील विभागीय कृषी संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन परिसराची पाहणी केली. या समितीमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कृषी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कृषी विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. बी.आर. उल्मेक, सामाजिक वनीकरण विभागाचे कोकण विभाग महासंचालक तथा मुख्य वनसंरक्षक यू.जी. अवसक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे नियंत्रक विश्वास जाधव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे नियंत्रक डॉ. राजीव कातारे, डॉ. एम.वाय. पालरपवार, डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलसचिव डॉ. एस.एस. नारखेडे, दापोली कृषी विद्यापीठाचे साहायक कुलसचिव ए.एस. पवार यांचा समावेश होता.यावेळी समिती सदस्यांनी विद्यापीठ सुरू करण्यासंबंधी आवश्यक सर्व सोयीसुविधा, दळणवळण, उपलब्ध जमीन आदींची माहिती जाणून घेतली. त्यामुळे विद्यापीठ स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. (तालुका प्रतिनिधी)