शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

लग्नापूर्वीच सिकलसेलची तपासणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 23:01 IST

सिकलसेल आजार हा अनुवंशिक आहे. या आजारातून कोणताही सिकलसेल रुग्ण व वाहक व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. हा आजार मुलांमध्ये येण्यामागे आई-वडीलच जबाबदार असतात. परंतू, या आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी एकदा तरी सिकसेल तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले.

ठळक मुद्देराजकुमार गहलोत : सिकलसेल आजार नियंत्रण दिनानिमित्त कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सिकलसेल आजार हा अनुवंशिक आहे. या आजारातून कोणताही सिकलसेल रुग्ण व वाहक व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. हा आजार मुलांमध्ये येण्यामागे आई-वडीलच जबाबदार असतात. परंतू, या आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी एकदा तरी सिकसेल तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले.राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमातंर्गत १९ जून जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिनाचा कार्यक्रम सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. चे. मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कार्डिले, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिकलसेल आजार नियंत्रणाकरिता जनजागृती रथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अमित प्रेमचंद, डॉ. बंडू रामटेके, प्रा. हेमंत वरघने आदी उपस्थित होते.डॉ. गहलोत पुढे म्हणाले, सिकलसेल आजार टाळण्यासाठी वाहक-वाहक व्यक्ती तसेच वाहकग्रस्त व्यक्तीमध्ये लग्न करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.समाजातील इतर व्यक्तींनासुद्धा सिकलसेल तपासणी करण्यास प्रोत्साहित करून या आजाराची माहिती जनसामान्यांना देऊन या आजाराच्या नियंत्रणाकरिता कार्य करण्याचे आवाहन जिल्हा सिकलसेल समन्वयक संतोष चात्रेशवार यांनी केले. तसेच सिकलसेल रुग्णांकरिता शासकीय योजनांची माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान डे-केअर सेंटरचे उद्घाटन तसेच गर्भजल परिक्षण करून आलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डे केअर तंत्रज्ञ अर्चना गावंडे, समुपदेशक भारती तितरे व संस्थेचे पर्यवेक्षक व स्वयंसेवक उपस्थित होते. संचालन जिल्हा सिकलसेल समन्वयक संतोष चात्रेशवार तर आभार समुपदेशक शेंदरे यांनी मानले.सिकलसेल आजाराची लक्षणेसिकलसेल रुग्णामध्ये वेळोवेळी हातपाय दुखणे, चक्कर येणे, नेहमी आजार पडणे, जंतुसंसर्ग होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या आजाराच्या रुग्णाने भरपूर पाणी प्यावे, नियमती आहार घ्यावा, नियमित फोलिक अ‍ॅसिड गोळ्यांचे सेवन करणे महत्त्वाचे असते. या आजाराच्या रुग्णांनी योग्य काळजी न घेतल्यास आजार पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार, आरोग्य तपासणी करणे व काळजी घेणे गरजेचे असते.