शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयमधील गैरप्रकाराची चौकशी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2017 00:45 IST

येथील साई आयटीआय परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होत असून, सामूहिक कॉपीला प्रोत्साहन दिले जात असून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप ...

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर समिती गठितचंद्रपूर: येथील साई आयटीआय परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होत असून, सामूहिक कॉपीला प्रोत्साहन दिले जात असून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप ताराशक्ती आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रपरिषद घेऊन केला होता. याप्रकरणी तक्रारीनंतर चौकशी समिती गठित करण्यात आली. समितीने चौकशी पूर्ण केली आहे. याप्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शासकीय आयटीआयचे प्राचार्य नितीन जुनोनकर यांच्याकडे करण्यात आली होती. साई आयटीआय येथे आयटीआयच्या परीक्षेचे केंद्र देण्यात आले आहे. ताराशक्ती आयटीआयचे परीक्षा केंद्रसुद्धा येथेच देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारीला झालेला पेपर तब्बल दोन तास उशिराने देण्यात आला. शिवाय विद्यार्थ्यांकडे पैशाची मागणी करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांनी पैसे दिले, त्यांची व्यवस्था स्वतंत्र खोलीत करण्यात आली. तर ज्यांनी पैसे दिले नाही, त्यांची व्यवस्था इतरत्र करण्यात आली, असा आरोप विद्यार्थ्यांनीकेला होता. पैसे न देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली नव्हती. त्यांना लघुशंकेसाठी बाहेरही येऊ दिले नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.शिवाय परीक्षा केंद्र बदलवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी पत्रपरिषदेत केली होती. आयटीआयचे प्राचार्य आणि केंद्रप्रमुख यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला होता. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, शासकीय आयटीआयचे प्राचार्य नितीन जुनोनकर यांच्याकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर सहा सदस्यीय चमूने याप्रकरणाची चौकशी केली. या चौकशीमध्ये गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आल्याचा अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकारऱ्यांकडे सादर केला आहे. साई आयटीआयच्या परीक्षा कंद्रप्रमुखावर कारवाई शिफारस जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आल्याची माहिती आहे. (नगर प्रतिनिधी)