शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

चंद्रपूरच्या युवकांच्या नावीन्यपूर्ण प्रयोगाची दखल जग घेईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:31 IST

जगामध्ये नवनवीन शोध लागत आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये घेत असलेल्या शिक्षणाची नव्या संशोधनासोबत सांगड घालणे, त्यासाठीचे प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळा उपलब्ध करणे आणि या प्रयोगाला बळ देणारा आर्थिक आराखड्याचे मार्गदर्शन करणारे, अर्थात शोध,......

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपूरच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेज, व टाटा टेक्नॉलॉजीमध्ये सामंज्यस करार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :जगामध्ये नवनवीन शोध लागत आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये घेत असलेल्या शिक्षणाची नव्या संशोधनासोबत सांगड घालणे, त्यासाठीचे प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळा उपलब्ध करणे आणि या प्रयोगाला बळ देणारा आर्थिक आराखड्याचे मार्गदर्शन करणारे, अर्थात शोध, नाविन्यता आणि त्याला व्यावसायिक निर्मितीचे अधिष्ठान देणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोवेशन, इनक्युबेशन ट्रेनिग सेंटरची चंद्रपूरमध्ये सुरुवात होणार आहे. चंद्रपूर गव्हर्नमेंट कॉलेज आॅफ इंजीनियरिंग व टाटा टेक्नॉलॉजीच्यामध्ये या प्रकल्पाचे प्रणेते राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी सामंजस्य करार झाला.अशा प्रकारचे सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोवेशन, इनक्युबेशन ट्रेनिग सेंटर (सीआयआयआयटी ) भारतात तीन ठिकाणी आहे. महाराष्ट्रात हे पहिलेच सेंटर चंद्रपूरमध्ये निर्माण होणार असून टाटा टेक्नॉलॉजीकडून अशा पद्धतीच्या तीन सेंटरची निर्मिती महाराष्ट्रात होणार आहे. यासाठी टाटा टेक्नॉलॉजीतर्फे १८९ कोटींची गुंतवणूक होणार आहे.यावेळी आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष रामपाल सिंग, टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या एशिया पॅसिफिकचे अध्यक्ष आनंद भदे, टाटा ट्रस्ट लिमिटेडच्या शिक्षण विभागाचे ग्लोबल डायरेक्टर पुष्कराज कौलगुड, प्रोजेक्ट डायरेक्टर सुशील कुमार, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य जी.जी. भुतडा उपस्थित होते.यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राचे वर्णन चांदा ते बांदा असे केले जाते. टाटा टेक्नॉलॉजीच्या मदतीने निर्माण झालेल्या सीट्रीपलआयटी यंत्रणेचा उपयोग करून महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेला चांदा सर्वांसाठी मार्गदर्शक जिल्हा बनेल, जगाला हेवा वाटेल असे नावीन्यपूर्ण प्रयोग संकल्पना या ठिकाणी तयार होतील. चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांनी केलेले प्रयोग जगामध्ये प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. टाटासारख्या व्यवस्थापनाला मोठया प्रमाणात कुशल मनुष्यबळाची गरज असते. या ठिकाणी तयार होणाºया कुशल मनुष्यबळाला लगेचच संधी देण्याचे कामदेखील टाटा ट्रस्ट करेल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.टाटा टेक्नॉलॉजीच्या एशिया पॅसिफिकचे अध्यक्ष आनंद भदे यांनी चंद्रपूरमध्ये हा प्रकल्प सुरू करताना आनंद होत असून यामागे खरी प्रेरणा आणि मार्गदर्शक वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार