शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:03 IST

अंगणवाडी सेविकांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षांवरुन ६० वर्षे करण्णयात आले आहे. त्यामुळे १ एप्रिलला १५ हजारांहून जास्त अंगणवाडी सेविका सेवानिवृत्त होणार आहे.

ठळक मुद्देरमेशचंद्र दहीवडे : निर्णय मागे घेण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतमूल : अंगणवाडी सेविकांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षांवरुन ६० वर्षे करण्णयात आले आहे. त्यामुळे १ एप्रिलला १५ हजारांहून जास्त अंगणवाडी सेविका सेवानिवृत्त होणार आहे. या निर्णयामुळे अंगणवाडी सेविकांवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा, असे प्रतिपादन प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केली.अंगणवाडी सेविकांचा मेळावा मूल येथे नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वैशाली बोकारे उपस्थित होत्या. प्रास्ताविक भाषणात प्रमिला गोडे म्हणाल्या, नियुक्तीच्या आदेशात सेवानिवृत्तीचे वय ६५ राहील, असे स्पष्टपणे लिहिले असताना वयोमर्यादा कमी करून ती ६० वर्षे करणे हे चुकीचे आहे. हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. प्रा. दहिवडे म्हणाले २६ जून १९७५ ला रात्री १२ वाजता आणिबाणी घोषित केली. त्यावेळी जे पांघरून घेवून झोपलेले होते त्यांना घरून उचलून आणण्यात आले. अशा लोकांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा आणि १२ हजार रुपये मासिक पेंशन देण्याच्या हालचाली सुरू आहे. हा खऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा घोर अपमान आहे. इंग्रज सरकारच्या विरोधात गुलामगिरी दूर करण्यासाठी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जे लढले तेच आहे खरे स्वातंत्र्य सैनिक, अंगणवाडी सेविकांकरिता निधी नसतो, मात्र अशा लोकांवर खर्च करण्यासाठी पैसा कुठून येतो, असा सवालही प्रा.दहिवडे यांनी केला. यावेळी वर्षा पाल, विजया महावादीवार, सिंधू कावळे, माया कोहपरे, छब बनकर उपस्थित होते.