शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इंजेक्शन, औषधांच्या तुटवड्याने रूग्ण बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 22:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात सध्या हिमोग्लोबीन इंजेक्शनसह औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रूग्णांना ...

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकाऱ्यांवर रोष : बाहेरून करावी लागते खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात सध्या हिमोग्लोबीन इंजेक्शनसह औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रूग्णांना खासगी औषधी दुकानात जावे लागत आहे. औषधी मिळत नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना रूग्णांच्या रोषालाही बळी पडावे लागत असल्याचे चित्र आहे.राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद, जिल्हा रूग्णालयांतील औषध पुरठ्याची जबाबदारी हाफकिन कंपनीकडे सोपविली होती. मात्र या कंपनीने गेल्या दोन वर्षांत मागणीनुसार औषधांचा पुरवठाच केला नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रात नेहमीच औषधांची टंचाई असते. प्रसुत झालेल्या महिलांचे हिमोग्लोबीन कमी असल्याने त्यांना इंजेक्शन देण्याचे निर्देश आहेत. मात्र अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात या इंजेक्शनचा तुटवडा आहे. इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी कित्येकदा जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाकडे करण्यात आली. मात्र अजूनही इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. परिणामी वैद्यकीय अधिकाºयांना रूग्णांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.थंडी वाढल्याने जिल्ह्यातील काही भागात ताप, सर्दी, खोकल्याचे रूग्ण मोठ्या प्रामणावर दिसून येत आहे. मात्र सर्दी, खोकल्यांच्या औषधसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे रूग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.जिल्ह्यात ५७ आरोग्य केंद्रजिल्ह्यात ५७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. जवळपास शंभराच्या आसपास उपकेंद्र आहेत. आरोग्य केंद्रे, उपकेंद्रात ताप, सर्दी खोकल्याचा औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे.