शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी कारच्या धडकेत कामगार ठार

By admin | Updated: November 26, 2014 23:03 IST

खासगी वापरासाठी वाहन खरेदी करायचे, नंतर या वाहनाचा वापर वेगळ्याच कामासाठी भाडेतत्वावर करायचा, असा प्रकार अलिकडे गडचांदूर आणि नांदाफाटा परिसरात सर्रास सुरू आहे.

लखमापूर : खासगी वापरासाठी वाहन खरेदी करायचे, नंतर या वाहनाचा वापर वेगळ्याच कामासाठी भाडेतत्वावर करायचा, असा प्रकार अलिकडे गडचांदूर आणि नांदाफाटा परिसरात सर्रास सुरू आहे. अशाच एका वाहनाने धडक दिल्याने अल्ट्राटेक सिमेंट उद्योगातील एक कंत्राटी कामगार ठार झाला तर दुसरा गंभीर अवस्थेत शासकीय इस्पितळात उपचार घेत आहे. सदर घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. नजिकच्या आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट उद्योगात सिमेंट लोडींग विभागात दर्शन अ‍ॅड कंपनी अंतर्गत सिपेल्ली लक्ष्मया इलाई हा पॅकर आॅपरेटर म्हणून कार्यरत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी हा कामगार दुसऱ्या पाळीत कर्तव्यावर गेला होता. रात्री १० वाजता पाळी आटोपून घरी जात असता मागून आलेल्या भरधाव कारने ( क्र. एम.एच.३४ एएम-२४१९) धडक दिली. अगदी कंपनीच्या आवारातच हा अपघात झाल्याने सोबतचे कामगार धावून आले. त्यांनी बघितले असता सिपेल्ली लक्ष्मय्या आणि टी. लक्ष्मण हे दोघे पॅकर आॅपरेटर जखमी अवस्थेत आढळले. लगेच त्यांना चंद्रपूरला हलवत असताना सिपेल्ली लक्ष्मय्या याचा वाटेतच मृत्यू झाला तर दुसरा टी.लक्ष्मण यास गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान अपघात होताच कारचालक भरधाव वेगाने गडचांदूर मार्गे पळून गेला. तथापि नांदाफाटा द्वारावर कंपनीने उभारलेल्या सीसीटीव्ही कॅमेरातून हे वाहन सुटू शकले नाही. लगेच पोलिसांना वाहन क्रमांक देण्यात आल्याने रात्रीच हे वाहन गडचांदूर ठाण्यात जमा करण्यात आले. दरम्यान कारचालक अविनाश मनोहर चव्हाण यास काल मंगळवारी नांदाफाटा पोलिसांनी अटक केली. सदर वाहन हे आवारपूर येथील एका शिक्षकाच्या मालकीची आहे.