शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या वनक्षेत्रातील जखमी वाघ चौथ्या दिवशीही उपचाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 15:33 IST

चिमूर वन परिक्षेत्रातील मुरपार उपक्षेत्रा अतंर्गत येणाऱ्या भान्सुली बिटातील कक्ष क्रमांक ५ मधील गाव तलावाशेजारी एका वाघाने मागील चार दिवसांपासून आश्रय घेतला आहे.

ठळक मुद्देउजव्या पायाला व डोक्यावर जखमावाघाची प्रकृती खालावलीट्रॅक्युलायझेशनची अद्यापही परवानगी नाही

राजकुमार चुनारकरचंद्रपूर : चिमूर वन परिक्षेत्रातील मुरपार उपक्षेत्रा अतंर्गत येणाऱ्या भान्सुली बिटातील कक्ष क्रमांक ५ मधील गाव तलावाशेजारी एका वाघाने मागील चार दिवसांपासून आश्रय घेतला आहे. त्याच्या उजव्या पायाला व डोक्यावर जखमा असल्याचे दिसत आहे. वाघ जागेवरून उठून तलावातील पाणीही पिऊ शकत नाही. त्याची प्रकृती खालावत असतानाही अद्याप वनविभागाकडून त्याच्यावर उपचार केला जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून २० किमी अंतरावरील भान्सुलीच्या जंगलात असलेला हा वाघ जबर जखमी आहे. जखमी असल्यामुळे तो दुसरीकडे जाण्यास हतलब ठरला आहे. गुरूवारी वनाधिकाऱ्यांनी कॅमेरे लावून त्याच्या हालचाली टिपल्या. वाघाच्या शरीरावर असलेल्या जखमा व पशु चिकीत्सकाचा अहवाल मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे वन विभागाकडून सांगितले जात आहे.वाघाला बेशुध्द करण्याची परवानगी पी.सी.सी.एफ. नागपूर यांच्याकडून घ्यावी लागते. मात्र चार दिवस लोटले तरीही वाघाला बेशुध्द करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे वन्यप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.शुक्रवारी दुपारी घटनास्थळावर मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, सहायक उप वनसंरक्षक आर.एम.वाकडे, वन्यजीवप्रेमी अमोद गौरकार यांनी जखमी वाघाची पाहणी केली. जखमी वाघाच्या सुरक्षेसाठी ४० कर्मचारी पहारा देत आहेत. गुरूवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान वाघाने तलावात पाणी पिले. मात्र शुक्रवारपासून वाघ पाणी पिण्यासाठीसुद्धा गेला नाही. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांनी त्याच्या रस्त्यावर एका मोठ्या पात्रात पाणी भरून ठेवले आहे. मागील चार दिवसांपासून वाघाने काही खाल्ले नसल्याने तो अशक्त झाला आहे. लवकर उपचार न झाल्यास वाघाचा मृत्यु होण्याची शक्यता वन्यजीव प्रेमींकडून वर्तविली जात आहे.चार दिवसांपासून वाघ उपाशीजखमी व आजारी अवस्थेत असल्यामुळे वाघाला शिकार करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून वाघ उपाशीच आहे. अशक्तपणामुळे वाघ शुक्रवारी तलावात पाणी पिण्यासाठीही जाऊ शकला नाही.

टॅग्स :Tigerवाघ