शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जखमी विद्यार्थ्याला तीन तास शाळेतच ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:41 IST

शाळेत खेळ सुरू असताना विद्यार्थी अंगावर पडल्याने एका विद्यार्थ्याचा हात मोडला.

ठळक मुद्देपालकांत संताप : गोंडपिपरीतील जि.प. शाळेतील प्रकार

चंद्रजित गव्हारे।आॅनलाईन लोकमतआक्सापूर : शाळेत खेळ सुरू असताना विद्यार्थी अंगावर पडल्याने एका विद्यार्थ्याचा हात मोडला. विद्यार्थी वेदनेने विव्हळत असतानाही शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केले नाही. एवढेच नाही तर पालकांना माहिती देण्याचे साधे सौजन्यही दाखविले नाही. अखेर सुटी झाल्यानंतरच सदर जखमी विद्यार्थ्याला रडतरडत घरी यावे लागले. हा संतापजनक प्रकार सोमवारी गोंडपिपरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडला.जखमी विद्यार्थ्याने घरी येऊन पालकांना घडलेल्या प्रकार सांगितला. कुटुंबीयाने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी हात मोडल्याचे निदान केले आहे. हा प्रकार बुधवारी इतर पालकांनाही माहित होताच शिक्षकांच्या अशा असंवेदनशिलतेविषयी त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.गोंडपिपरी येथील जि.प. उच्च प्राथमिक कन्या शाळेत ३१ जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार होते. कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून सोमवारी विद्यार्थ्याचा सराव सुरू होता. दरम्यान, इयत्ता सहावीतील विद्यार्थी प्रवीण हरिदास घोगरे हा लघुशंका करून येत होता. अशातच त्याच्या अंगावर काही विद्यार्थी पडले. यामुळे त्याच्या हाताला चांगलीच दुखापत झाली. हा प्रकार गंभीरच होता. मात्र वर्ग शिक्षिका अर्चना जिरकुंटवार यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले. रुग्णालयात दाखल करणे तर सोडाच; पण विद्यार्थ्याच्या पालकाला जखमीची माहिती देण्याचे साधे सौजन्यही या शिक्षिकेने दाखविले नाही. सायंकाळी विद्यार्थी घरी परतल्यानंतर हा प्रकार त्याने पालकांना सांगितला. यावेळी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. क्ष-किरण तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाºयांनी त्याचा हात मोडल्याचे स्पष्ट केले.तब्बल तीन तास विद्यार्थ्याला वेदनेने विव्हळत शाळेतच सुटी होतपर्यंत ताटकळत रहावे लागले. यामुळे संतप्त झालेले पालक हरिदास घोगरे यांनी शाळेत जाऊन याप्रकरणी जाब विचारला. मात्र यावेळी मुख्याध्यापक कन्नाके यांनी विद्यार्थ्याने आम्हाला काही सांगितलेच नाही, असे सांगत वेळ मारून नेली. दरम्यान, हा प्रकार बुधवारी गोंडपिपरीत पालकांच्या चर्चेचा विषय होता.