नवरगाव : माकडांना हनुमानाचा अवतार समजल्या जातो. अशाच एका बंदराला विजेचा शॉक लागला आणि ते जखमी झाले. त्याने चक्क रत्नापूर येथील हनुमान मंदिरात आश्रय घेतला. याबाबतची माहिती ग्रामस्थांना होताच त्याला बघण्यासाठी मंदिरात गर्दी केली. त्यानंतर वन विभागाला माहिती देताच कर्मचारी दाखल झाले आणि त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आला.रत्नापूर येथे दोन दिवसांपासून बंदारांनी धुमाकूळ घातला आहे. इकडून- तिकडे उड्या मारत असताना एका मादी माकडाचा स्पर्श वीज वाहक ताराला झाला. माकड खाली पडले. यामध्ये त्याला जबर जखम झाली. जखमी अवस्थेत असलेल्या बंदराने जिवाच्या भीतीने हनुमान मूर्तीच्या पायाशी आधार घेतला. याबाबत माहिती होताच नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली. येथील वनरक्षक आर. यू.शेख यांना माहिती मिळताच ते आपल्या सहकाऱ्यांना घेऊन मंदिरात दाखल झाले. उपचार करण्यासाठी पशुवैद्यकाला पाचारण करण्यात आले. सदर माकडाच्या पोटात गर्भ होता. जखमी अवस्थेमुळे त्याचा गर्भपात झाला. जखमी बंदरावर उपचार करून वन विभागाने जंगलामध्ये सोडले. (वार्ताहर)
जखमी माकडाने घेतला हनुमान मंदिरात आश्रय
By admin | Updated: October 28, 2014 22:55 IST