शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मोबदल्यासाठी महापारेषण कंपनी घेणार पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:04 IST

महापारेषण कंपनीकडून वीज पुरवठा करून घेण्यासाठी रेल्वे विभाग आणि खासगी कंपन्यांनी मागणी केली होती. या मागणीला उर्जा विभागाने मान्यता दिली असून विद्युत अधिनियम अंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातून वाहिन्या उभारताना तातडीने मदत मिळावी, यासाठी महापारेषण कंपनी पुढाकार घेणार आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : वाहिनी उभारण्याचा मार्ग सुकर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महापारेषण कंपनीकडून वीज पुरवठा करून घेण्यासाठी रेल्वे विभाग आणि खासगी कंपन्यांनी मागणी केली होती. या मागणीला उर्जा विभागाने मान्यता दिली असून विद्युत अधिनियम अंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातून वाहिन्या उभारताना तातडीने मदत मिळावी, यासाठी महापारेषण कंपनी पुढाकार घेणार आहे. यापूर्वी वीज विकत घेणाऱ्या कंपनीवरच जमीन मालकांना मदतीसाठी अवलंबून राहावे लागत होते.महापारेषण कंपनीने जिल्ह्यातील पाच ठिकाणी विद्युत वाहिण्या उभारण्यास मंजुरी दिली आहे़ वीज वाहिन्यांचे संचलन व सूव्यवस्था करण्याची जबाबदारी महापारेषण कंपनीची आहे. खासगी कंपन्या मोठ्या प्रमाणात वीज पारेषणकडून विकत घेतात. वीज वाहिन्या कार्यान्वित करण्यापूर्वी संबंधित जागेचा मोबदला शेतकºयांना मिळावा, यासाठी विद्युत अधिनियम २००३ कलम ६८ चा यावेळी आधार घेण्यात आला आहे़वीज वाहिनी उभारून संबंधित कंपनीला वीज पुरवठा करण्यासाठी महापारेषण कंपनीने काही अटी पुढे ठेवल्या आहेत. त्यामध्ये शेतजमिनीचा मोबदला हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. जिल्ह्यामध्ये महापारेषण कंपनीने पाच प्रकल्प मंजूर केले आहेत़ त्यामध्ये नागभीड वीज उपकेंद्र तसेच आसगाव-ब्रह्मपुरी मार्गाने लिलो पद्धतीची वाहिनी २१ किमी अंतरावर टाकण्यात येणार आहे. याशिवाय १३२ केव्ही उपकेंद्र दुहेरी सर्किट स्ट्रींगींग करण्यासाठी २७ किमी अंतरावर वीज वाहिनी टाकली जाणार आहे़ या कामासाठी शेतकऱ्यांची जमीन घ्यावी लागणार आहे. मात्र आर्थिक मोबदला देताना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी महापारेषण कंपनीने स्वत:कडे मुख्य जबाबदारी ठेवली. जीएमआर एनर्जीसाठी दुहेरी परिपथ वाहिनी १२ किमी अंतरावर टाकण्यास मंजुरी देण्यात आली. याकरिताही जमीन लागणार आहे.खासगी कंपनीला जमीन देताना मोबदल्याचा प्रश्न अडचणीचा ठरत होता़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती़ नव्या नियमानुसार संबंधित कंपनी मोबदला देण्यास दुर्लक्ष करत असेल तर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी आता महापारेषण कंपनीने स्व:तहून घेतली आहे. महापारेषण कंपनीच्या प्रकल्पासाठी शेतकºयांची जमीन अधिगृहीत करू शकते़ शासनाच्या नियमाप्रमाणे मोबदला देणे बंधनकारक आहे. यापूर्वी खासगी कंपनीला वीज वाहिन्या टाकून दिल्यानंतर शेतकºयांना जमिनीचा मोबदला मिळण्यास बराच विलंब व्हायचा़ या घटना टाळण्यासाठी महापारेषणने विशेष लक्ष घालण्याचे धोरण तयार केले आहे.