शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांची माहिती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:26 IST

जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी प्रशासन आपल्या स्तरावर प्रयत्न करीत आहे. मात्र लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश करण्याचे काम जागरुक नागरिक करू शकतात. त्यांनी स्थानिक स्तरावरील यंत्रणांकडे याबाबतची माहिती द्यावी. या जिल्ह्यामध्ये एकही बोगस डॉक्टर लोकांच्या जीविताशी खेळता कामा नये, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे.

ठळक मुद्देकुणाल खेमणार : आरोग्य यंत्रणेने तपास मोहीम राबवण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी प्रशासन आपल्या स्तरावर प्रयत्न करीत आहे. मात्र लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश करण्याचे काम जागरुक नागरिक करू शकतात. त्यांनी स्थानिक स्तरावरील यंत्रणांकडे याबाबतची माहिती द्यावी. या जिल्ह्यामध्ये एकही बोगस डॉक्टर लोकांच्या जीविताशी खेळता कामा नये, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे.शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बोगस डॉक्टर शोध व कार्यवाही समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा परिषदचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, तालुका वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी खेमनार पुढे म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून येत आहेत. या डॉक्टरांमुळे नागरिकांचे जीवत्व धोक्यात येत आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील नागरिक, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच, तलाठी यांच्याकडून वेळोवेळी माहिती घेवून बोगस डॉक्टरांवर धाडी टाकण्यात येवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा सूचना संबंधीत यंत्रणेला त्यांनी दिल्या. विना परवानगीने चालविण्यात येणाºया नर्सिग होमची माहिती घेण्यात यावी, आणि अशा नर्सिग होमला शेवटची नोटीस देवून त्यांच्या नर्सिग होम तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. तक्रार आल्यास त्याची चौकशी पूर्ण झालीच पाहीजे, अशी ताकीदही त्यांनी दिली.