शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी आठवडी बाजारात सुरू केले माहिती केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 22:44 IST

शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन मिळावे, यासाठी अंबुजा सिमेंट फाउंडेशनतर्फे राजुरा तालुक्यातील पाचगाव येथे आठवडी बाजारात माहितीचे केंद्र सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देअंबुजा फाऊंडेशनचा उपक्रम : परिसरातील शेतकऱ्यांनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन मिळावे, यासाठी अंबुजा सिमेंट फाउंडेशनतर्फे राजुरा तालुक्यातील पाचगाव येथे आठवडी बाजारात माहितीचे केंद्र सुरू करण्यात आले.माहिती केंद्रातून गुलाबी बोंडअळी, माती परीक्षण, बियाण्यांची लागवड कशी करायची, कीटकनाशक वापरताना दक्षता कशी घ्यावी. आधुनिक शेतीसाठी कृषी योजना व अन्य पैलुंवर मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय, त्यासंबंधीचे माहिती पत्रकही शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. शेतीविषयक चित्रपटही दाखविण्यात आला. या चित्रपटातून शेतकऱ्यांना शेतीच्या नाविण्यपूर्ण प्रयोगाची माहिती मिळाली. अंबुजा फाऊंडेशनचे उत्पादक व्यवस्थापक प्रीतम कोरे, विशाल भोगावार, सिद्धेश्वर जंपलवार, दिनेश वांढरे, सुचिता खडसे, दीपक साळवे, सुभाष बोबडे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम आठवडी बाजारात राबविण्यात आला. प्रकल्प क्षेत्र अधिकारी गोपाल जंबुलवार, रूपेश गेडेकर, महेश झाडे, हरी बोढे, साईनाथ पिंपळशेंडे, प्रदीप बोबडे, अश्विनी जेनेकर आदींनी अंबुजा फाऊंडेशनअंतर्गत शेतकऱ्यांसाठ सुरू केलेल्या योजनांचीही माहिती दिली. या माहिती केंद्राला पाचगाव, चंदनवाही, साखरवाही, कोची, खामोना, अहेरी, पांढरपौनी व रानवेली परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेतला. गावागावांत जाऊन शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी जागृती करण्याचा संकल्प अंबुजा सिमेंट फाऊंडेशनने केला आहे.तालुक्यात सुरू केलेल्या कृषी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शेतकऱ्यांशी यापुढेही सुसंवाद ठेवण्यात येणार आहे. यादृष्टीने शेतीसोबच विविध उपक्रमांचे नियोजन सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.