शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा वेलू गेला गगनावरी जनसामान्यांचे जगणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST

तांत्रिक युगात मानवाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. परिणामी, इंधन दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात मागील पंधरवड्यात  वाढ झाली आहे. तब्बल अकरा दिवसात पेट्रोल अकरा रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे दळणवळण खर्चातही वाढ झाली आहे.

दत्तात्रय दलालब्रम्हपुरी  :  देशात पेट्रोल, डिझेलचे दर दिवसागणिक वाढत आहेत. अकरा दिवसात तब्बल अकरा रुपयांनी पेट्रोलचे तर डिझेलचे दरही त्याच प्रमाणात वाढले आहेत. परिणामी दळणवळणचा खर्च वाढला आहे.  त्यामुळे जीवनाश्यक वस्तुंसह  इतर वस्तूंचेही दर वाढले आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. अल्प मिळकत आणि खर्च आवाक्याबाहेर असल्याने प्रपंच कसा चालवावा, असा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.तांत्रिक युगात मानवाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. परिणामी, इंधन दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात मागील पंधरवड्यात  वाढ झाली आहे. तब्बल अकरा दिवसात पेट्रोल अकरा रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे दळणवळण खर्चातही वाढ झाली आहे. परिणामी, दररोज लागणारा भाजीपाला, किराणासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत आपसूकच वाढ झाली आहे. तर कापड, पोलाद, सिमेंट आदी प्रत्येक वस्तूंच्या किमतीतही कमालीची वाढ झाल्याने आता घर बांधणेही आवाक्याबाहेर झाले आहे. प्रवास खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेला प्रचंड समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर सर्वसामान्य नागरिकांना वाढलेल्या महागाईत प्रपंच कसा चालवावा, असा प्रश्न पडला आहे.

मजुरीत वाढ अत्यल्प, दैनंदिन खर्च परवडेनाविटाभट्टी, बांधकाम, विविध आस्थापनातील कामगार आदी मजुरांची वाढत्या महागाईने काही प्रमाणात मजुरी वाढली; परंतु दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हा पैसा कमी पडतो. त्यामुळे कष्ट करूनही पदरी पैसा शिल्लक राहत नाही. मजुरीत काही प्रमाणात वाढ झाली; मात्र दैनंदिन खर्च परवडत नाही. सध्या लग्न समारंभाची धूम आहे; मात्र महागाईत उपवरांचे लग्न कसे पार पाडावे, असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :Petrolपेट्रोल