शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त सहा शेतकऱ्यांना ठरविले अपात्र

By admin | Updated: July 28, 2015 02:12 IST

दरवर्षीची दुष्काळी परिस्थती, सततची नापिकी व डोक्यावर कर्जाचा डोंगर अशा विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांत

गतवर्षी जिल्ह्यात ३० शेतकऱ्यांच्या आत्महत्या : १८ प्रकरणात मदत तर ६ प्रलंबितचचंद्रपूर : दरवर्षीची दुष्काळी परिस्थती, सततची नापिकी व डोक्यावर कर्जाचा डोंगर अशा विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. २०१४ या एका वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल ३० शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. मात्र यापैकी ६ जणांच्या मदतीचे प्रस्ताव प्रलंबित ठेवून दुसऱ्या सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी प्रशासनाकडे हेलपाट्या माराव्या लागत आहे. २०१४ या एका वर्षांत १ जानेवारी ते २४ जुलै या काळात तब्बल ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील १८ शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी १ लाख असे १८ लाख रूपये वितरीत करण्यात आले आहे. मात्र सहा शेतकऱ्यांचे मदत प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असून दुसऱ्या सहा शेतकऱ्यांचे प्रस्तावच मात्र नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी प्रशासनाच्या सतत हेलपाट्या माराव्या लागत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न सुरू आहेत. सिंचन सुविधा, आर्थिक मदतीचे पॅकेज, कर्जमाफी अशा विविध योजनांच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. मात्र यानंतरही गत काही वर्षांत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा कमी झालेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. समाजाची मानसिकता व सरकारी कायदेही अप्रत्यक्ष शेतकरी आत्महत्येसाठी कारणीभूत असल्याचे दिसून येते. सरकारने शेतकऱ्यांसाठी जे कायदे केले त्याचे मात्र पायच मुळात कमकुवत आहे. त्यामुळे ज्या योजना आहेत, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. परिणामी शेतकरी त्या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शासनस्तरावर मंजूर झालेला निधी प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचावा यासाठीही शासनाचे प्रयत्न सुरू केले. मात्र अद्याप तरी यश आलेले नाही. शेतकऱ्यांचे प्रशिक्षणवर्ग घेऊन केवळ शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, हा संदेश दिल्याने आत्महत्या थांबणार नसून यावर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी शेकत्यांकडून होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)नाकारलेल्या प्रस्तावांचीफेरचौकशी नाहीआत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे येते तेव्हा तो प्रस्ताव अपात्र, पात्र ठरविण्यासाठी समितीद्वारे चर्चा होते. मात्र जे प्रस्ताव अपात्र ठरविले जातात त्या प्रकरणाची फेरचौकशी होणे आवश्यक आहे. मात्र प्रलंबित ६ व अपात्र ठरविलेल्या ६ अशा १२ प्रस्तावांपैकी एकाही प्रस्तावाची फेरचौकशी झालेली नाही.कर्जाचा डोंगर वाढलाकाँग्रेस सरकारच्या काळात कर्जमाफी करण्यात आली होती. मात्र गेल्या आठ ते दहा वर्षापासून कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर आहे. नापिकी व दुष्काळामुळे उत्पन्नात घट होत असल्याने कर्ज फेडायचे कसे, अशा विवंचनेत शेतकरी आहेत. परिणामी आत्महत्या वाढल्या आहेत. शासकीय निकष किचकट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने काही निकष ठरवून दिले आहेत. त्यामुळे निकषात न बसणारी घटना आत्महत्या म्हणून गणली जात नाही. त्यामुळे अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना कुटुंबाला आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.मदतीसाठी कुटुंबाचा टाहोआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती निघून गेल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत कुटुंब आहेत.