शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग समूहांनी शेतकºयांसाठी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 23:57 IST

चंद्रपूर जिल्हयाच्या औद्योगिक विकासामध्ये स्थानिक उद्योग समूहांचा फार मोठा सहभाग आहे. या ठिकाणी मोठया रोजगाराच्या संधी आपल्या मार्फत उपलब्ध झाल्या आहेत.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : रोजगारयुक्त तालुक्यांच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयाच्या औद्योगिक विकासामध्ये स्थानिक उद्योग समूहांचा फार मोठा सहभाग आहे. या ठिकाणी मोठया रोजगाराच्या संधी आपल्या मार्फत उपलब्ध झाल्या आहेत. मात्र औद्योगिक विकासासोबत आपला शेतकरी बांधव चिंताग्रस्त असणे प्रगत समाजाचे लक्षण नाही. त्यामुळे शेतकºयांच्या जीेवनात परिवर्तन आणण्यासाठी विविध योजनांमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवा, असे आवाहन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील मोठया उद्योग समूहांची महत्वाची बैठक ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात घेण्यात आली. यावेळी उद्योग समूहाच्या समस्याबद्दल ना.मुनगंटीवार यांनी माहिती घेतली. जिल्हयातील शेतकºयांच्या उत्पन्नाला दुप्पट करण्याचे धोरण असून त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तयार केलेल्या पंचसुत्रीवर सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी केले.उद्योग समूहामध्ये स्थानिक मुलांना अधिक रोजगार मिळावा, यासाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रम सूचविण्यात यावे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मुलांना शिकत असतानाच उद्योग समूहामध्ये सरावासाठी व औद्योगिक भेटीसाठी पुढाकार घेण्यात यावा, शेतकºयांसाठी वेगवेगळी मदत करण्याऐवजी सामूदायिकरित्या उपयोगी ठरेल, अशा पध्दतीच्या यंत्र खरेदीसाठी जिल्हाधिकाºयांनी कृषी यंत्र बँक सुरु केली असून अनेक गावांमध्ये भाजीपाला क्लस्टर सारखे नवे प्रयोग होत आहे. यासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्यात यावी. पुढील वर्षीच्या वृक्षलागवडीमध्ये अधिसूचित केलेल्या चौदा वृक्षांच्या नर्सरी सुरु करण्यात याव्या. यातून निर्धारित रोपे वाढविण्यात यावी. मानव विकास नामांकनामध्ये मागे असणाºया पाच तालुक्यांना रोजगारयुक्त तालुके बनविण्यामध्ये सहभाग नोंदवावा, अशा अपेक्षा ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.या बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्यासह, आमदार नाना शामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर आदींची उपस्थिती होती.