शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णा येथे औद्योगिक वसाहतीला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:34 IST

चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा येथे औद्योगिक क्षेत्र अर्थात एमआयडीसी स्थापन करण्यासाठी उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीने मान्यता प्रदान केली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सततच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देउच्चाधिकार समितीचे शिक्कामोर्तब : विकासाला चालना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा येथे औद्योगिक क्षेत्र अर्थात एमआयडीसी स्थापन करण्यासाठी उद्योग विभागाच्या उच्चाधिकार समितीने मान्यता प्रदान केली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सततच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.आदिवासीबहुल असलेल्या पोंभुर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यात यावे, यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील आहेत. विधानसभा सदस्य असताना त्यांनी सदर मागणी विधानसभागृहाच्या माध्यमातून सातत्याने रेटली व पाठपुरावा केला. पोंभुर्णा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी मौजे कोसंबी (रिठ) खासगी १०२.५० हे. आर क्षेत्रास महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ च्या कलम ३३ (२) अन्वये जमिनीचे नुकसान भरपाईचे दर निश्चितीबाबत प्रस्ताव उच्चाधिकारी समिती पुढे सादर करण्यात आला होता.१९ आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती प्रस्तावित केल्याप्रमाणे कोसंबी (रिठ) येथील खासगी १०२.५० हे. आर क्षेत्रात प्रति हेक्टर १० लाखप्रमाणे दरास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे पोंभुर्णा येथे एमआयडीसी स्थापन करण्याचा मार्ग सुकर व सुलभ झाला आहे.पोंभुर्णा तालुक्याचा औद्योगिक विकास व्हावा व तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. पोंभुर्णा पोल्ट्री प्रोड्युसर्स कंपनी ही आदिवासी महिलांची महाराष्ट्रातील पहिली कुक्कुटपालन व्यवसाय करणारी संस्था त्यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आली आहे.पोंभुर्णा तालुक्यात दुग्ध व्यवसाय प्रकल्प, टूथपिक तयार करण्याचा प्रकल्प असे विविध प्रकल्प राबवून या तालुक्याला रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. पोंभुर्णा येथे एमआयडीसी स्थापन होण्याने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या मानसाला बळकटी प्राप्त होणार आहे.बांबू संशोधन केंद्रासाठी बस उपलब्धबल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे बांबु हॅन्डीक्राफ्ट अ‍ॅन्ड आर्ट युनिट या संस्थेच्या उदघाटन समारंभात अर्थ व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर युनिटला भेट देण्यास येणाऱ्या लोकांसाठी, संशोधकांच्या प्रवासासाठी तसेच महिला कामगारांची ने-आण करण्यासाठी २५ सीटर बस बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली या संस्थेला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. सदर आश्वासनाची पूर्तता झालेली असून बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली या संस्थेला आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २५ सीटर बस उपलब्ध करण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. नियोजन विभागाने २९ नोव्हेंबर रोजीच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना तत्संबंधाने सूचना दिल्या आहेत.