शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन तंत्रज्ञानाने साकारले जातेयं इनडोअर स्टेडियम

By admin | Updated: March 3, 2016 00:59 IST

कोणत्याही समाजाची मूल्ये ही क्रीडा व खेळांद्वारे प्रतिबिंबीत होतात व त्यातूनच समाज घडतो. खेळांमुळे व्यक्तींचा सर्वांगीण विकास होतो.

भद्रावतीतील खेळाडूत आनंद : नीळकंठराव शिंदे महाविद्यालयाचा उपक्रमसचिन सरपटवार भद्रावतीकोणत्याही समाजाची मूल्ये ही क्रीडा व खेळांद्वारे प्रतिबिंबीत होतात व त्यातूनच समाज घडतो. खेळांमुळे व्यक्तींचा सर्वांगीण विकास होतो. याच गोष्टींचे महत्व जाणून भद्रावती येथील नीळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातर्फे अमेरिकन तंत्रज्ञानाच्या आधारे बॅडमिंटन टेबल टेनिससह कुस्ती, तलवार, तायक्वांदो व अन्य खेळांसाठी इनडोअर स्टेडीयम साकारण्यात येत आहे. या इनडोअर स्टेडीअमचे मुख्य आकर्षण म्हणजे अमेरिकन तंत्रज्ञानाच्या आधारे रुफींग व बेडींग मशीनद्वारे स्टेडियमवर टाकण्यात आलेले छप्पर हे आहे.या बांधकामासाठी महाविद्यालयाला विश्व विद्यालय अनुदान आयोगाकडून ४० लाख रुपये मंजूर झाले असून संस्थेतर्फेसुद्धा २० लाख खर्चून कुस्तीसाठी हॉल बांधण्यात आला आहे. आपल्या क्षेत्रात चांगले खेळाडू तयार व्हावे यासाठी हे स्टेडियम उभारण्यात आल्याचे संस्थेचे सदस्य डॉ. विवेक शिंदे यांनी सांगितले.बॅडमिंटन हॉलची लांबी २२ मीटर व रुंदी १३ मीटर तर दुसऱ्या हॉलची रुंदी ११ मीटर व लांबी १४.५ मीटर आहे. या इनडोअर स्टेडीयमसाठी छताच्या दृष्टीने गॅलव्हानाईस हे मेटल वापरण्यात आले आहे. या सिटची जाडी ०.८० एम.एम असून रुंदी ९१४ एमएच आहे. रुफींगमध्ये फॅन व लाईटच्या हुकांनी व्यवस्था करण्यात आली असून कंपनीकडून २० वर्षाची हमी देण्यात आली आहे. इनडोअर स्टेडियमवर छत टाकण्याच्या प्रक्रियेत क्रेन मशीन मुख्य आकर्षण ठरली होती. क्रेनची लिफ्टींग क्षमता ४५ टन तर क्रेनचा बुम ३३.५० मीटर होता. मशिनची रुंदी ४.५० मीटर आहे व यात हायड्रोलिक सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. रुफींग व बेडींग मशिनद्वारे अवघ्या अर्धा तासात ही रुफींग सिट तयार होऊन ती छप्पर म्हणून टाकण्यात आली. एक प्लेट गॅलव्हानाईझ सिटपासून छप्पर तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे तर भद्रावतीकर आकर्षित झाले होते, हे पाहण्यासाठी भद्रावतीकरांची एकच झुंबड उडाली होती. अशा प्रकारचे छप्पर टाकण्याचा भद्रावतीतला हा पहिलाच प्रसंग असल्याचे संस्थेचे सदस्य डॉ. कार्तिक शिंदे, डॉ. विशाल शिंदे व अजय आसूटकर यांनी सांगितले.गॅलव्हानाईस सिटचे छप्परमध्ये कसे रुपांतर होते, हेसुद्धा एक आकर्षण होते. या मशीनवर ओरिसा व झारखंड येथील कामगार काम करीत असल्याचे सुपरवायझर हितेश पटेल व भिमराव मोरे यांनी सांगितले. येत्या एका महिन्यात या इनडोअर स्टेडीयमला सुरुवात होणार असून भद्रावती येथील क्रीडाप्रेमींना ही एक आंनदाची पर्वणीच ठरणार आहे.