शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या प्रतिसादासह वाढल्या मुक्कामी बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

कोरोनामुळे मागील वर्षी पहिल्यादांच बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर, रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. आता पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या धावत आहेत. मात्र, शाळा बंद असल्याने मानव विकासच्या, तसेच ग्रामीण भागातील मुक्कामी असणाऱ्या अनेक बसफेऱ्या बंद होत्या, परंतु मागील महिन्यात माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे प्रवासी वर्गाच्या मागणीनुसार जिल्ह्यात मुक्कामी बस सुरू करण्यात आल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरताच बसफेऱ्यांची संख्या वाढली. प्रवाशांचा प्रतिसादही मिळायला लागला. त्यातच माध्यमिकच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार मुक्कामी बसेसही वाढविण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ५४ मुक्कामी बसेसपैकी ४० बस सुरू झाल्या आहेत. जसजशी बसची मागणी होत आहे. त्यानुसार, बस सुरू करण्यात येत आहेत. कोरोनामुळे मागील वर्षी पहिल्यादांच बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर, रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. आता पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या धावत आहेत. मात्र, शाळा बंद असल्याने मानव विकासच्या, तसेच ग्रामीण भागातील मुक्कामी असणाऱ्या अनेक बसफेऱ्या बंद होत्या, परंतु मागील महिन्यात माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे प्रवासी वर्गाच्या मागणीनुसार जिल्ह्यात मुक्कामी बस सुरू करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील आगारात असलेल्या एकूण ५४ मुक्कामी बसपैकी ४० बस सुरू करण्यात आल्या आहेत. चिमूर तालुक्यात विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मानव विकासच्या बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. जसजशी प्रवाशांची मागणी वाढणार, असे तसतशा बसफेऱ्याही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली. 

सायंकाळच्या सुमारासच्या बसफेऱ्या बंदपूर्वी आगारातून मोठ्या प्रमाणात बसफेऱ्या धावत होत्या. आता काही प्रमाणात बसफेऱ्या सुरू झाल्या असल्या, तरी सायंकाळच्या सुमारासच्या बसफेऱ्या अद्यापही बंदच आहेत. चंद्रपूरवरून गडचिरोली जाण्यासाठी पूर्वी ९.१५ वा.ची शेवटची बस होती. मात्र, कोरोनामुळे ही बस बंद करण्यात आली आहे. आता ७ वाजतानंतरही गडचिरोलीसाठी एकही बस नाही. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सायंकाळी ८.३०, रात्री ९.१५ वाजताची गडचिरोलीसाठी बसफेरी सुरू करावी, अशी मागणी आहे.

मुक्कामी गाडी  येत नसल्याने त्रास

बस सुरू झाल्या आहेत. मात्र, पूर्वीच्या तुलनेत कमी बस आहेत. त्यामुळे प्रवास करण्यास मोठी अडचण जाते. सर्वच सुरळीत झाले आहे. त्यामुळे महामंडळाने पूर्वीसारख्याच बसफेऱ्या सुरू कराव्या. खासगी वाहनाला मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळत आहेत. तसेच त्याची वाहने रात्री-बेरात्री धावत आहेत. मात्र महामंडळाच्या मोजक्या बस धावत आहे.अजित गेडाम, प्रवासी

चंद्रपूरवरून पूर्वी गडचिरोली जाण्यासाठी शेवटची बस ९.१५ वाजताची होती. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी काम करायला येणाऱ्यांना काम आटोपून गावाला जाण्यास सोईचे होते. मात्र, आता ती बस बंद केली असून, सायंकाळी ७ वाजताची शेवटची बस आहे. त्यामुळे प्रवाशांची अडचण होते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बसफेरी सुरू करावी.-अमित दुधे, प्रवासी 

मुक्कामी बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्या, तरी अनेक ठिकाणच्या बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे सकाळच्या सुमारास शहरात जायचे असल्यास मोठी अडचण होत आहे. आता व्यवहार सुरळीत झाले असल्याने शहरात कामासाठी जावे लागते. त्यामुळे सर्वच बस सुरू करण्यात याव्या.-अमोल गेडाम, प्रवासी

ग्रामीण भागातील गाळीतही जागा मिळेनाबसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्या, तरी अद्यापही पूर्वीप्रमाणे बस सुरू नाही. ग्रामीण भागात मोजक्याच बसफेऱ्या धावत आहेत. सायंकाळच्या सुमारासच्या बसफेऱ्या अद्यापही बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात एक किंवा दोनच बस धावत आहेत. परिणामी, या बसमध्ये प्रवाशांना पाय ठेवण्यासाठीही जागा नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे बसफेऱ्या वाढविण्याची मागणी होत आहे.

१४ मुक्कामी गाड्यांचे कायपूर्वी जिल्ह्यातून चारही आगारातून ५४ मुक्कामी बसफेऱ्या धावत होत्या. मात्र, कोरोनाने मुक्कामी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. मात्र, आता माध्यमिक शाळा सुरू झाल्याने ४० मुक्कामी गाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्यापही १४ मुक्कामी गाड्या बंद आहेत. प्रवाशांची मागणी वाढल्यास या बसफेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :state transportएसटी