शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या विकासात जिल्ह्याचा सहभाग वाढवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:33 IST

महाराष्ट्राच्या विकासामध्ये चंद्रपूरचा मोलाचा वाटा असला पाहिजे. जेव्हा जेव्हा राज्याला गरज पडली तेव्हा तेव्हा या जिल्ह्याने पुढे येऊन मदत केली आहे. माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्यापासून राज्याच्या मदतीला धावून जाण्याचे कार्य सुरू आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा पोलीस मैदानावर ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्राच्या विकासामध्ये चंद्रपूरचा मोलाचा वाटा असला पाहिजे. जेव्हा जेव्हा राज्याला गरज पडली तेव्हा तेव्हा या जिल्ह्याने पुढे येऊन मदत केली आहे. माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्यापासून राज्याच्या मदतीला धावून जाण्याचे कार्य सुरू आहे. राज्याला ऊर्जा पुरविणारा हा जिल्हा असून यापुढेही राज्याच्या विकासात जिल्ह्याचा सहभाग वाढावा, अशी अपेक्षा राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्र तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिवस चंद्रपूर येथे पोलीस मैदानावर उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. सकाळी ८ वाजता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ध्वजारोहण केले. यावेळी उपस्थिताना शुभेच्छा संदेश देताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सिमेंट, कोळसा, कागद व वीज निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कामगारांना कामगार दिनाच्यादेखील शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाºया ज्येष्ठ नागरिकांना, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनादेखील ना. मुनगंटीवार यांनी यावेळी अभिवादन केले. ध्वजारोहणानंतर त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांशीदेखील संवाद साधला.अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कानावत यांनी पोलीस दलाच्या पथकाचे संचलन केले. महाराष्ट्र दिनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी सत्कार करण्यात आला. ब्रह्मपुरी तालुक्यातील तलाठी आकाश भाकरे यांना यावेळी जिल्ह्यातील आदर्श तलाठी म्हणून पुरस्कृत करण्यात आले.ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभाला आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मोटूसिंग व मंगला आसूटकर यांनी केले.तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी डॉ .कुणाल खेमनार यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMaharashtra Dayमहाराष्ट्र दिन