शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सायबर क्राईमचे प्रमाण वाढले

By admin | Updated: February 2, 2017 00:30 IST

कॅशलेस व्यवहारात सायबर क्राईमचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम परस्पर काढली जात आहे.

सावधानतेचा इशारा : बँकेतून खात्री करुनच व्यवहार करावाब्रह्मपुरी : कॅशलेस व्यवहारात सायबर क्राईमचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ग्राहकांच्या खात्यातील रक्कम परस्पर काढली जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी कुठलीही माहिती मोबाईल वर न देता बँकेत परस्पर जाऊन व्यवहार करण्याचे आवाहन बँकेच्या व्यवस्थापकांनी केले आहे.मागील आठ दिवसांमध्ये दोन ते तीन ग्राहकांच्या खात्यातील रक्कम फसवा कॉल करुन काढल्या जाण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. निनावी कॉल करुन एटीएम बंद पडल्याचे सांगून सुरु करण्याविषयी आग्रह केला जातो. मी बँकेचाच कर्मचारी बोलत असल्याचे सांगून संपूर्ण माहिती विचारली जाते व काही तासानंतर खात्यामधून शिल्लक रक्कम पूर्णच्या पूर्णच काढली जाण्याचे प्रकार प्रस्तूत प्रतिनिधी व बँक व्यवस्थापनासमोर उघडकीस आले असल्याने पुन्हा ग्राहकांची दिशाभूल होऊ नये म्हणून व्यवस्थापकांनी ग्राहकांना सावधनतेचा इशारा दिलेला आहे. कोणताही निनावी कॉल आल्यास आपल्या एटीएम संदर्भात माहिती देवू नये व तशा कॉलवर जास्त वेळ न बोलता तो बंद करुन घ्यावा. त्यानंतर ज्या बँकेत आपला खाता असेल, त्या शाखेत जाऊन विचारपूस करावी. बँकेतून फोन आलाच तर लॅडलाईनवरुन येत असल्याने आपल्या शहराचा कोड नंबर आपल्याला ओळखता येतो. त्यावरुन हा फोन बँकेतूनच आला, हे समजण्यास मदत होत असते. बँक कोणत्याही ग्राहकाला शक्यतो फोन करीत नाही व मोबाईलवरुन तर बँकेचा कोणताही कर्मचारी फोन करीतच नाही. त्यामुळे मोबाईलवर आलेल्या निनावी फोनवरुन आपल्या पर्सनल अकाऊंट अथवा एटीएमची माहिती कोणत्याही ग्राहकांनी देऊ नये, असे आवाहन सर्वच बँक शाखेच्या व्यवस्थापकांनी खातेदारांना केली आहे. सायबर क्राईमचे प्रमाण सध्या वाढले आहे. अशा क्राईमचा शोध घेण्यासाठी अडचणी येत असल्याने काढल्या गेलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे ग्राहकांनी वाढत्या सायबर क्राईमच्या गुरफट्यात येऊ नये व शंका आल्यास थेट बँकेत संपर्क साधावा, असेही बँक व्यवस्थापन व पोलिसांनी म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)