शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:45 IST

वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे सर्दी, ताप- खोकला आदी रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालये फुल्ल दिसून येत आहेत.

ठळक मुद्देरुग्णालये फुल्ल : वातावरणातील बदलाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे सर्दी, ताप- खोकला आदी रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालये फुल्ल दिसून येत आहेत.एकीकडे सर्दी, कप व खोकल्याने रुग्ण बेजर झाले आहेत. दुसरीकडे अनेक रुग्ण हे तापाने फणफणावत आहेत. त्या कारणाने या दिवसांची नागरिकांनी सतर्क राहावे व काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज हजारो रुग्ण हे तपासणीसाठी दाखल होत आहेत.तर प्रत्येक खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा या आजाराने शेकडो रुग्ण आढळून येत असून, वेळेवर जर उपचार घेतला नाही, तर रुग्ण गंभीर होऊ शकतो. त्या कारणाने एकीकडे डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. मागी काही दिवसात चंद्रपुरात एक शिक्षिका व एका इंजिनिरअरचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे विषाणूज्य तापाचेसुद्धा रुग्ण आढळून येत असल्याने ताप अंगावर काढू नका, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.विशेष म्हणजे, ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढला आहे. शिवाय वैद्यकीय उपचार थातूरमातूर असल्याने परिस्थिती दाहक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण शहरामध्ये दाखल होऊन उपचार घेत आहेत. तर ग्रामीण भागातील शासकीय व खासगी दवाखाने रुग्णांच्या संख्येने फुल्ल दिसून येत आहेत.जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडाजिल्हा परिषदमार्फत चालविण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा तुटवडा आहे. परिणामी रुग्णांना खासगी औषध भंडारातून औषधांची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. आरोग्य केंद्रात खोकल्यावरील औषध, तापावरील पॅरासिटामोल, अंग दुखण्यावरील डायक्लोफेन्यॉक अशा विविध औषधांची कमतरता आहे. परिणामी डॉक्टरांनाही रुग्णांना कोणती औषध द्यावी, हा प्रश्न पडतो. तर रुग्णांना खासगी भंडारातून औषधांची खरेदी करावी, लागत असल्याने आरोग्य विभागाविषयी रोष व्यक्त होत आहे.