बामणी ते नवेगाव राज्य महामार्गाचे दुपदरीकरणाचे काम गडचिरोली विभागांतर्गत सुरू आहे. महामार्गाचे काम संपुष्टात आले असले तरी किरकोळ कामे शिल्लक आहेत. त्यातच कोठारी येथील मोठ्या पुलाचे बांधकाम बाकी आहे. त्यामुळे जुना टोलनाका परिसरात वळण मार्गावरच बांधकाम कंपनीने कच्चे बांधकाम केले आहे. तसेच कंपनीने धोक्याची सूचना देणारे फलक लावलेले नाहीत. यामुळे भरधाव येणारे वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून अपघात घडण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. आतापर्यंत अनेक ट्रक, चारचाकी वाहने, दुचाकी वाहने क्षतिग्रस्त झाली आहेत. यात अनेक वाहनचालक, प्रवाशांना दुखापती झाल्या, जीवही गेले, कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे. बांधकाम कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना परिणाम भोगावे लागले आहेत. याकडे गडचिरोली बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
190721\1133-img-20210719-wa0008.jpg
प्रमोद येरावार