शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक आकापूर येथील घटना

By admin | Updated: May 11, 2014 00:09 IST

गडचिरोलीवरुन चंद्रपूरकडे जाणार्‍या भरधाव टॅÑव्हल्सची ट्रकला धडक बसली. या अपघातात ट्रॅव्हर्समधील १२ जण गंभीर जखमी झाले.

ट्रॅव्हल्समधील १२ प्रवासी जखमी

मूल : गडचिरोलीवरुन चंद्रपूरकडे जाणार्‍या भरधाव टॅÑव्हल्सची ट्रकला धडक बसली. या अपघातात ट्रॅव्हर्समधील १२ जण गंभीर जखमी झाले. सदर घटना मूलपासून चार किमी अंतरावरील आकापूर येथे शनिवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली. सध्या लग्नसराई असल्यामुळे ट्रॅव्हल्स व चारचाकी वाहनाने अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या वाहनधारकाचे चांगलेच फावत आहे. गडचिरोलीवरुन चंद्रपूरकडे जाणार्‍या दुर्गा ट्रॅव्हल्सने (एम.एच. ३४ ए- ८३३३) मूलजवळील आकापूर वळणमार्गावर सावलीवरुन राजोलीकडे जाणार्‍या ट्रकला (एम.एच. ३४ एबी- ५५४६ ) धडक दिल्याने ट्रॅव्हल्स मधील १२ जण गंभीर जखमी झालेले आहेत. सदर घटनेची माहिती मूल पोलिसांना मिळताच सहायक फौजदार श्रीराम कुमरे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ट्रकचालक शिवबरण सब्दीन निशाद (५५) रा. विवेकानंद वार्ड चंद्रपूर यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली आहे. निष्काळजीपणे व भरधाव वेगाने ट्रॅव्हल्स चालविल्यामुळे ट्रॅव्हल्सचालक स्वप्नील रमेश आप्रेटवार रा. जुनोना चौक चंद्रपूर हा गंभीर जखमी आहे तर चालक शिवबरण सब्दीन निशाद (५५) रा. विवेकानंद वार्ड चंद्रपूर, प्रकाश संदोकार (३५) रा. मोखाळा, भिका लाबाडे (३८) रा. रामाळा, विठ्ठल चिमूलवार (५२) रा. हिरापूर, खुशाल मादेशवार (३४) रा. रुद्रापूर, सुवर्णा मादेशवार (३०) रा. रुद्रापूर, मीनाक्षी शेंडे (१८) रा. पवना, रत्नमाला कावळे (२२) रा. गुंजेवाही, यशोदाबाई मोहुर्ले (५०) रा. बल्लारशहा, रजोत नागुलवार (१८) रा. आकापूर, मंगेश शेंडे (२४) रा. दिघोरी हे जखमी झाले असून त्यांच्यावर मूल व चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे. ट्रकचालकाच्या फिर्यादीवरुन ट्रॅव्हल्स चालक स्वप्नील रमेश आपेटीवार याच्यावर मूल पोलिसांनी कलम २७९, ३३७, ४२७ व मोटारवाहन कायदा १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नव्या ठाणेदारामुळे मूल शहरातून होणारी अवैध वाहतूक बंद होईल अशी अपेक्षा नागरिकांची होती. मात्र नागरिकांच्या अपेक्षेवर विरजन पडले. अवैध वाहतुकीमुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत असून अवैध वाहतूक बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)