शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांचे आता बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:47 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून काढून टाकल्यामुळे या कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले होते.

ठळक मुद्देआंदोलन तीव्र : सात दिवसांच्या साखळी उपोषणाची दखल नाही

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून काढून टाकल्यामुळे या कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र अद्यापही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने कामगारांनी आता आंदोलन आणखी तीव्र ेकेले आहे. ८ जानेवारीपासून प्रहारच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.१३७अन्यायग्रस्त कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याची न्यायोचित मागणीसाठी प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून साखळी उपोषणास सुरुवात केली. यादरम्यान, उपोषणकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलनात्मक उपक्रम राबविले. चार दिवसांपूर्वी एका गरजू रुग्णाला रक्ताची गरज असल्याने उपोषणकर्त्यांनी त्याला रक्तदान करुन आंदोलनादरम्यान सामाजिक बांधिलकीचाही परिचय दिला. शनिवारी जटपुरा गेट ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत झाडू मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. यादरम्यान माजी खासदार नाना पटोले हे चंद्रपुरात आले असता त्यांनीही कामगारांची मागणी रास्त असल्याचे सांगून प्रशासनास सूचनाही केल्या.साखळी उपोषणाचा सातवा दिवस सुरू असतानाही रुग्णालय प्रशासनाने कामगारांची मागणी मान्य केलेली नाही. त्यामुळे आता आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय प्रहार व कामगारांनी घेतजला आहे. ८ जानेवारीपासून प्रहारचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक पप्पु देशमुख बेमुदत उपोषण सुरु करणार आहेत. त्यांच्यासोबत काही कामगारही असणार आहेत.महिला काँग्रेस कमिटीचा पाठिंबारविवारी महिला काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने उपोषण मंडपाला भेट दिली. या शिष्टमंडळात बल्लारपूरच्या माजी नगराध्यक्ष रजनी हजारे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका नंदा अल्लूरवार, सुनिता धोटे व चंद्रपूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका अनिता कथडे उपस्थित होत्या. शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या आंदोलनाला आपला सक्रीय पाठिंबा दर्शविला.