शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचे उद्घाटन

By admin | Updated: July 11, 2016 00:50 IST

जिल्ह्यातील विसापूर येथे २५ वी मुले आणि १८ व्या मुली सब ज्युनिअर आट्या-पाट्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन ....

कीर्तीवर्धन दीक्षित : खेळ भावनेचा विकास व्हावाचंद्रपूर : जिल्ह्यातील विसापूर येथे २५ वी मुले आणि १८ व्या मुली सब ज्युनिअर आट्या-पाट्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित यांच्या हस्ते शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले. यावेळी डॉ. दीक्षित यांनी आट्या-पाट्या खेळातून खेळ भावनेचा विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी मंचावर महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. दिलीप जैयस्वाल, राज्य आट्या-पाट्या महामंडळाचे सचिव डॉ. दीपक कविश्वर, गोंडवाना विद्यापीठ शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक कोहळे, प्राचार्य डॉ. वेगीनवार, प्राचार्य डॉ. संजय सिंग, डॉ. वरभे, शासकीय कबड्डी प्रशिक्षक डॉ. बोंडे, श्रीमती जयस्वाल, जिल्हा कोषाध्यक्ष विजय लडके आदी उपस्थित होते.स्पर्धा संयोजक समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिलीप जैस्वाल यांच्या हस्ते माजी कुलगुरू प्राचार्य दीक्षित व छत्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य डॉ. कविश्वर यांचा तर प्राचार्य डॉ. दीक्षित यांच्या हस्ते महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. दिलीप जयस्वाल यांचा सत्कार करण्यात आला. राज्य महामंडळाचे सचिव डॉ. कविश्वर यांनी प्रास्ताविक केले. तर जिल्हा संघाचे सचिव प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांनी संचालन व आभार प्रदर्शन केले. स्पर्धेत राज्यातील २८ जिल्ह्यातील मुला-मुलींचे आट्या-पाट्या संघ सहभागी झाले आहेत. प्रथम मुले (उस्मानाबाद), द्वितीय- वासीम, तृतीय- भंडारा, मुली- प्रथम उस्मानाबाद, द्वितीय वासीम, तृतीय (चंद्रपूर) खेळाडू, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक व अधिकारी मिळून अंदाजे ५०० लोकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था जिल्हा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. स्टेट चॅम्पिनशिपच्या या आंतरजिल्हा स्पर्धेतून राष्ट्रीय आट्या-पाट्या स्पर्धेसाठी संघाची निवड केली जाणार आहे. (प्रतिनिधी)