शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री फिरत्या संगणक शिक्षण शाळेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:46 IST

तालुक्यातील उच्च प्राथमिक मराठी शाळा दिघोरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : प्रेरणादायी शाळा गावागावात निर्माण करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : तालुक्यातील उच्च प्राथमिक मराठी शाळा दिघोरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते पालकमंत्री फिरत्या संगणक शिक्षण शाळेचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम, उपसभापती विनोद देशमुख, गटविकास अधिकारी शशीकांत शिंदे, उपशिक्षणाधिकारी किशोर काळे, दिघोरीच्या सरपंच बयाबाई निमसरकार आदी उपस्थित होते.दिघोरी शाळा आंनददायी शिक्षण देणारी शाळा असून विविध उपक्रम या शाळेत राबविले जातात. यातुनच खरे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची प्रेरणा मिळत असते. शिक्षकांनी जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी दिघोरी सारख्या प्रेरणादायी शाळा गावागावात निर्माण करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शिक्षकांचे काम कुंभाराप्रमाणे असून विद्यार्थी हा मातीचा गोळा आहे. चांगला विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांना करायचे आहे. संगणकामध्ये प्रचंड माहितीची शक्ती असून यामुळे विद्यार्थ्यांना आवड असणारे क्षेत्र निवडण्याची संधी प्राप्त होणार आहे. गाव शाश्वत, स्वच्छ राखण्यासाठी गावातील प्रत्येकांनी स्वच्छतागृही म्हणून काम करावे, असे ते म्हणाले म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीडीओ कासर्लावार यांनी तर आभार मुख्याध्यापक सुनील कोहपरे यांनी मानले.दोन तासांचे शिक्षणजिल्ह्यातील टाटा ट्रस्टच्या मदतीने चंद्रपूर, जिवती, पोंभुर्णा, मूल, बल्लारपूर व गोंडपिपरी या तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना पालकमंत्री फिरते संगणक शिक्षण शाळेचा फायदा होणार आहे. आठवड्याला दोन तास असे ६० तासांच्या प्रशिक्षणातून शालेय विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान प्राप्त करता येणार आहे.